पिंपरी चिंचवड - 'आहात आपण खूपच महान, चालू केली मदिरा-पान.. चालू दे तुमचे राजकारण, भक्तांना का त्रास विनाकारण' अशा घोषणा देत मागण्यांचे फलक हातात घेऊन विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. मंडई गणपती मंदिरासमोर शंख ढोल-ताशांचा निनाद करून सरकारला जाग यावी आणि मंदिरे लवकर उघडावी, अशी मागणी आंदोलनाद्वारे करण्यात आली.
विश्व हिंदू परिषदेतर्फे महाराष्ट्रातील मंदिरे उघडण्याकरिता शंख, ढोलनाद आंदोलन - महाराष्ट्रातील मंदिरे उघडण्याकरिता शंख, ढोलनाद आंदोलन
महाराष्ट्रातील मंदिरांच्या माध्यमातून हजारो लोकांच्या वर्षभराच्या रोजी-रोटीची व्यवस्था होत असते. हे सगळे सरकारच्या निष्काळजीपणाने ठप्प झाली आहे. किमान आतातरी सरकारने समाजाचा आक्रोश लक्षात घ्यावा आणि कोट्यवधी हिंदूंच्या भावनांचा विचार करावा त्वरित सर्व देवालय भक्तांसाठी खुली करावी.

महाराष्ट्रातील मंदिरांच्या माध्यमातून हजारो लोकांच्या वर्षभराच्या रोजी-रोटीची व्यवस्था होत असते. हे सगळे सरकारच्या निष्काळजीपणाने ठप्प झाली आहे. किमान आतातरी सरकारने समाजाचा आक्रोश लक्षात घ्यावा आणि कोट्यवधी हिंदूंच्या भावनांचा विचार करावा त्वरित सर्व देवालय भक्तांसाठी खुली करावी. गेली चार महिने टप्प्याटप्प्याने का होईना सर्व व्यवहार सुरू झाले आहेत. सर्व बाजारपेठा, भाजीबाजार, मॉल, सर्व दुकाने, बँका, सर्व कार्यालये सुरू झाली आहेत. हे सगळे सुरू आहे तर मंदिरे का उघडली जात नाहीत, असा प्रश्न पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पांडुरंग राऊत यांनी सरकारला केला आहे.
यावेळी विश्व हिंदू परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पांडुरंग राऊत किशोर चव्हाण मनोहर यांच्यासह कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. सुरक्षित अंतराचा नियम पाळून हे आंदोलन करण्यात आले. मंडई गणपतीसह तुळजाभवानी मंदिर, सतववाडी हडपसर येथील मंदिरासमोर हे आंदोलन करण्यात आले. सरकारने मंदिरे त्वरित उघडली नाही तर परिषदेतर्फे राज्यभरात आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.