पिंपरी-चिंचवडमधील कोविड सेंटरच्या जेवणात अळ्या, व्हिडिओ व्हायरल - पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट बामती
आकुर्डी येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये कोरोनाबाधित रुग्णाच्या जेवणाच्या ताटात जीवंत अळी निघाल्याचा प्रकार आज समोर आला. या प्रकरणी संबंधित कोरोनाबाधित रुग्णाने जेवण पुरवणाऱ्या व्यक्तींना याविषयी माहिती दिली पण त्यांनी दखल घेतली नसल्याचे त्याने माहिती दिली आहे. या दोन्ही गंभीर प्रकरणामुळे महानगर पालिकेचा भोंगळ कारभार पुढे आला आहे.
पिंपरी-चिंचवडमधील कोविड सेंटरच्या जेवणात अळ्या
पिंपरी-चिंचवड (पुणे) -पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना कोरोनाबाधित रुग्णांना निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असल्याचे प्रकरण उजेडात आले आहे. जेवणात अळ्या, किडे निघत असल्याचा व्हिडिओ समोर आला असून हा प्रकार चिंचवडमधील ईएसआय रुग्णालयात घडला. हे प्रकरण महानगर पालिका श्रावण हर्डीकर यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत, अशी माहिती त्यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली आहे.
Last Updated : Jul 25, 2020, 1:03 PM IST