महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राष्ट्रवादीवर लेटर बॉम्ब.. पक्ष संघटनेत 80 टक्के स्थान मराठा समाजाला - खासदार वंदना चव्हाण

शहर राष्ट्रवादीच्या पक्ष संघटनेच्या नियुक्तीवर आक्षेप घेणारे पत्र सध्या व्हायरल झाले आहे. पक्ष संघटनेत ८० टक्के मराठा समाजाला स्थान देण्यात आल्याचा आरोप या पत्रात करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी

By

Published : Aug 13, 2019, 11:52 AM IST

पुणे- शहर राष्ट्रवादीच्या पक्ष संघटनेच्या नियुक्तीवर आक्षेप घेणारे पत्र सध्या व्हायरल झाले आहे. पक्ष संघटनेत ८० टक्के मराठा समाजाला स्थान देण्यात आल्याचा आरोप या पत्रात करण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीमधील खदखद बाहेर आली आहे. मात्र, पक्षात अशी कुठलीही गटबाजी नाही. सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन पद दिली जात असतात. त्यामुळे अशा प्रकारचे आरोप करणे चुकीचे आहे. तरी यामध्ये काही चुकीचे असेल तर सुधारणा होईल, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण यांनी दिले

राष्ट्रवादीमध्ये निनावी पत्राने खळबळ; पक्ष संघटनेत 80 टक्के मराठा समाजाला स्थान दिल्याचा आरोप

राष्ट्रवादी पक्षात कुठलीही खदखद नाही. निनावी पत्र हे विरोधकांचे षडयंत्र असून सांगली, कोल्हापूर येथील पूरस्थितीवरुन लक्ष विचलित करण्यासाठी भाजपच्या आयटी सेलकडून असे फेक पत्र व्हायरल केली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणावरुन राजकारण तापण्याची शक्यता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details