पुणे - विधानसभा निवडणुकीत शिवसंग्रामला सन्मानपूर्वक जागा मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच शिवसंग्रामची 2 आकडी जागा लढण्याची तयारी आहे, अशी प्रतिक्रिया विनायक मेटे यांनी व्यक्त केली आहे.
शिवसंग्रामची दोन आकडी जागा लढण्याची तयारी, विनायक मेटे यांची प्रतिक्रिया - शिवसंग्राम पक्ष
पुण्यात झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला आहे. त्यानुसार शिवसंग्रामकडे अनेक सक्षम उमेदवार उपलब्ध असून, राज्यात शिवसंग्रामकडून अनेक जागांवर निवडणूक लढवण्यासाठी तयारी सुरू करण्यात आल्याचेही मेटे यांनी सांगितले.
शिवसंग्राम पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक सोमवारी पुण्यात पार पडली यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी मेटे म्हणाले, की विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या जागावाटपाचा निर्णय प्रलंबित आहे. यासंदर्भात काही बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. मात्र, मुख्यमंत्र्यांनी सर्व घटक पक्षांना सन्मानपूर्वक जागा देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. यासंदर्भात युतीच्या बैठकीत चर्चा केल्यानंतरच निर्णय जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे यासंदर्भात काही बोलणे योग्य होणार नाही.
पुण्यात झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला आहे. त्यानुसार शिवसंग्रामकडे अनेक सक्षम उमेदवार उपलब्ध असून, राज्यात शिवसंग्रामकडून अनेक जागांवर निवडणूक लढवण्यासाठी तयारी सुरू करण्यात आल्याचा दावाही मेटे यांनी केला आहे.