पुणे - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी विक्रम भावे याचा जामीन अर्ज आज (मंगळवारी) न्यायालयाने फेटाळला. विशेष न्यायाधीश एस.आर. नावंदर यांनी हा आदेश दिला.
डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण : विक्रम भावेचा जामीन अर्ज फेटाळला - न्यायाधीश एस.आर. नावंदर बातमी
अॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना अटक करण्यात आली होती. अॅड. पुनाळेकर यांना काही अटी-शर्तीवर जामीन मिळाल्यानंतर भावे याने देखील जामिनासाठी अर्ज केला होता.
हेही वाचा-कुर्ल्यात प्रवासी महिलेवर सामूहिक बलात्कार; चार आरोपींना अटक
या प्रकरणात अॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना अटक करण्यात आली होती. अॅड. पुनाळेकर यांना काही अटीशर्तीवर जामीन मिळाल्यानंतर भावे याने देखील जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, प्रकरणातील एका आरोपीने दिलेल्या जबाबात भावेचे नाव आहे. आतापर्यंत झालेल्या तपासातून भावेचा या गुन्ह्यात प्रथमदर्शनी सहभाग दिसून येतो. भावे याला यापूर्वी एका गुन्ह्यात शिक्षा झाली असून तो सध्या जामिनावर आहे. असे असताना त्याचे या गुन्ह्यात नाव आल्याने न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे भावे कोठडीतील मुक्काम वाढला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 30 जानेवारी रोजी होणार आहे.