महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अष्टविनायकांपैकी एक असलेल्या पुण्यातील ओझरच्या विघ्नेश्वराचा जन्मोत्सव उत्साहात

ओझरच्या विघ्नेश्वर येथे भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे.

By

Published : Sep 3, 2019, 10:43 AM IST

विघ्नेश्वर गणेशमूर्ती

पुणे- अष्टविनायकांपैकी एक असलेल्या पुणे जिल्ह्यातील ओझरच्या विघ्नेश्वर गणपतीचा. ओझर येथे पाच दिवसांचा कालपासून (सोमवार) जन्मोत्सव सुरु झाला आहे. त्या निमित्ताने पेशवेकालीन पेहरावे व विविध सोन्याच्या दागिन्यांनी सजवलेल्या विघ्नेश्वराचे रूप पाहण्यासाठी भाविक मोठी गर्दी करत आहेत.

ओझरच्या विघ्नेश्वराचा जन्मोत्सव साजरा

अष्टविनायकांपैकी एक असलेल्या पुणे जिल्ह्यातील ओझरच्या विघ्नेश्वराचे वर्षभरातून २ वेळा म्हणजे भाद्रपद शुद्ध चतुर्थीला आणि माघ शुद्ध चतुर्थीला फक्त १ दिवस रूप पाहायला मिळते. विघ्नेश्वराच्या डोळ्यातील माणिकरत्न, कपाळावरचा हिरा, चंद्रकोर, गळ्यातील चंद्रहार, स्वस्तिक हार, डोक्यावरची छत्री, कंठीहार, शिवगंध आणि कंबरेचा करदोरा हे सर्व कोट्यवधींचे सोन्याचे दागिने आणि हिरे माणिक परिधान केलेले. गणपतीचे विलोभनीय रूप विघ्नेश्वराच्या दर्शनाला येणाऱ्या प्रत्येक भाविकांच्या डोळ्याचे पारणेच फिटल्या सारखे वाटते.

ABOUT THE AUTHOR

...view details