महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Uttara Baokar Passed Away : प्रसिद्ध अभिनेत्री उत्तरा बावकर यांचे निधन; वयाच्या ७९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - उत्तरा बावकर यांचे 12 एप्रिलला निधन

प्रसिद्ध अभिनेत्री उत्तरा बावकर यांचे 12 एप्रिलला निधन झाले. वयाच्या ७९ व्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्या दीर्घ आजाराने त्रस्त होत्या. त्यांनी अनेक मराठी, हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले होते.

Uttara Baokar Death
उत्तरा बावकर यांचे निधन

By

Published : Apr 13, 2023, 7:45 AM IST

Updated : Apr 13, 2023, 9:44 AM IST

पुणे :अभिनेत्री आणि नाट्य कलाकार उत्तरा बावकर यांचे वयाच्या ७९ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले की, गेल्या एक वर्षापासून आजारी असलेल्या बावकर यांनी मंगळवारी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. बुधवारी सकाळी उत्तरा बावकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले, असे त्यांनी सांगितले. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये (एनएसडी) अभिनयाचे शिक्षण घेतलेल्या बावकर यांनी 'मुख्यमंत्री'मधील पद्मावती, 'मेना गुर्जरी'मधील मेना, शेक्सपियरच्या 'ऑथेलो'मधील डेस्डेमोना, नाटककार गिरीश कर्नाड यांच्या 'तुघलक'मधील आई अशा विविध नाटकांमध्ये त्यांनी भूमिका केल्या.

सशक्त स्त्री पात्रे साकारणारी अभिनेत्री : गोविंद निहलानी यांच्या 'तमस' चित्रपटातील त्यांच्य भूमिकेमुळे बावकर या प्रसिद्धीच्या झोतात आल्या होत्या. त्यांनी सुमित्रा भावे यांच्या वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटांमध्ये देखील काम केले. चित्रपट निर्माते सुनील सुकथनकर यांनी सांगितले की, त्यांनी बावकर यांच्यासोबत सुमारे आठ वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या दीर्घकाळाच्या सहकलाकार सुमित्रा भावे तिला सशक्त स्त्री पात्रे साकारू शकणारी अभिनेत्री म्हणून ओळखत होत्या. आमच्या चित्रपटांमध्ये महिलांच्या भूमिका होत्या आणि ती एक शिस्तप्रिय अभिनेत्री होती, असे ते म्हणाले.

सुमित्रा भावेंच्या अनेक चित्रपटांमध्ये काम :१९८६ मध्ये ‘यात्रा’ मालिकेतून सिनेसृष्टीत उत्तरा बावकर यांनी पदार्पण केले होते. त्याबरोबर ‘दोघी’ या मराठी चित्रपटात उत्तरा बावकर यांनी १९९५ मध्ये काम केले. ‘वास्तूपुरुष’ (२००२), ‘उत्तरायण’ (२००३), ‘शेवरी’ (२००६), ‘रेस्टोरेंट’ (२००६) यांसारख्या मराठी चित्रपटातही त्यांनी काम केले होते. उत्तरा बावकर यांनी सुमित्रा भावेंच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते. उत्तरा बावकर यांची मुद्रा अभिनय आणि आवाजी अभिनय यावर हुकूमत होती. उत्तरा बावकर यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा येथे अनेक वर्षे अध्यापनाचे काम केले होते. एक दिन अचानक’, ‘रुक्मावती की हवेली’, ‘द बर्निंग सीजन’, ‘सरदारी बेगम’ यांसारख्या चित्रपटांत देखील त्यांनी काम केले होते.

हेही वाचा : सामाजिक विषयावरील ‘मन धागा धागा जोडते नवा’ मालिकेतून दिव्या पुगावकर नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला

Last Updated : Apr 13, 2023, 9:44 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details