पुणे :पिंपरी-चिंचवडमध्ये वाहन तोडफोडीचे सत्र सुरूच आहे. पिंपरीमधील वाघेरे वसाहतीत अज्ञात टोळक्याने 4 ते 5 वाहनांची तोडफोड केली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून रस्त्यावर वाहन पार्क करायचे की नाही? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. मात्र, पुन्हा एकदा पोलिसांची कामगिरी ढिसाळ असल्याचे समोर आले आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये अज्ञातांकडून वाहनांची तोडफोड हेही वाचा - बेकायदेशीर विवाह प्रकरणात महिला पोलीस अधिकार्याला शिक्षा
पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकीवरून आलेल्या अज्ञात तीन जणांच्या टोळक्याने धुडगूस घालत 4 ते 5 वाहनांची दगडाने तोडफोड केली आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, शहरात अनेक वेळा वाहन तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. घटनेप्रकरणी पिंपरी पोलीस अधिक तपास करत असून समाजकंटकांचा शोध घेत आहेत. मध्यरात्री झालेल्या तोडफोडीमुळे पिंपरी पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिक करत आहेत. या घटनेप्रकरणी गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू आहे.
हेही वाचा - पुणे-सोलापूर महामार्गावर चारचाकीची दुचाकीला धडक, तीन जण जागीच ठार