पुणे -पिंपरी चिंचवडमध्ये ( Pimpri Chinchwad ) नव वर्षाचा पहिला दिवस उजडण्यापूर्वीच गुन्हेगारीने तोंड वर काढलं आहे. रात्रभर पार्ट्या रंगणार असल्याने शहरभर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता. अशात ही समाजकंटकांनी 22 वाहनांची तोडफोड ( Vehicles Vandalized ) केली. मध्यरात्री दोनच्या सुमारास ही घटना वाकड पोलिसांच्या हद्दीत ( Wakad Police ) घडली. रिक्षातून आलेल्या चौघांनी दगड, सिमेंट ब्लॉकने परिसरातील वाहनांच्या काचा फोडल्या तर घराबाहेर उभ्या असणाऱ्या दुचाकींची मोडतोड केली.
Vehicles Vandalized : पिंपरी-चिंचवडमध्ये अज्ञातांकडून वाहनांची तोडफोड - Wakad Police
पिंपरी चिंचवडमध्ये ( Pimpri Chinchwad ) अज्ञातांकडून 22 वाहनांची तोडफोड ( Vehicles Vandalized ) करण्यात आली आहे. ही घटना मध्यरात्री वाकड पोलिसांच्या ( Wakad Police ) हद्दीत घडली. रिक्षातून आलेल्या चौघांनी दगड, सिमेंट ब्लॉकने परिसरातील वाहनांच्या काचा फोडल्या.
चिंचवड शहरातील गुन्हेगारी -नूतन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पिंपरी- चिंचवड शहरातील गुन्हेगारीने डोकं वर काढलं आहे. सांगवी आणि वाकड पोलिस ठाण्याची हद्द असलेल्या राहटणी आणि पिंपळे सौदागर येथे मध्यरात्री एकूण 20 ते 22 वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. शनिवारी 31 डिसेंबर असल्याने शहरात दीड हजारापेक्षा जास्त पोलिस बंदोबस्त होता.
सिमेंटच्या गट्टूने वाहनांची तोडफोड-अज्ञात चार ते पाच जणांच्या टोळक्याने रिक्षातून येऊन दिसेल त्या दुचाकी, चारचाकी ला लक्ष करत कोयत्याने, सिमेंटच्या गट्टूने वाहनांची तोडफोड केली आहे. तोडफोड करणाऱ्या टोळक्याला पकडण्याचा प्रयत्न वाकड पोलिस कर्मचाऱ्याने केला. पण, त्यांना धक्काबुकी करून अज्ञात तोडफोड करणारे व्यक्ती पसार झाले आहेत. याबाबत सांगवी, वाकड पोलिस अधिक तपास करत आहेत.