पुणे- मुळशी तालुक्यातील साले येथे सुभद्रा मंगल कार्यालयात विवाह सोहळा सुरू असताना लावलेल्या फटाक्यांमुळे आग लागली. या आगीत चार वाहने जळून खाक झाली आहेत.
लग्नात विघ्न..! फटाक्यांमुळे लागली भीषण आग, चार वाहने भस्मसात - वाहने जळून खाक
मंगल कार्यालयाजवळ लग्न समारंभावेळी लावलेल्या फटाक्यामुळे जवळ असलेल्या वाहनांनी पेट घेतला. यात चार वाहने जळून खाक झाली आहे.
पेटलेली वाहने
आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. एका चारचाकीत लहान मुलगी झोपली होती. तिला वेळेत बाहेर काढल्यामुळे अनर्थ टळला. यात दोन चारचाकी आणि दोन दुचाक्या जळून खाक झाल्या आहेत.
हेही वाचा -'मुलींसाठी लष्कर सुरक्षित क्षेत्र, मराठी मुलींनी लष्करात यावे'
Last Updated : Mar 8, 2020, 3:15 PM IST