महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पिंपरी-चिंचवडमध्ये अज्ञातांनी केली वाहनांची तोडफोड;आरोपी फरार - पिंपरी चिंचवड क्राईम न्यूज

पिंपरी-चिंचवड शहरातील नेहरू नगर परिसरात पहाटेच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांनी वाहनांची तोडफोड केली आहे. यात चार वाहनांचा समावेश असून मोठ्या प्रमाणावर वाहनांचे नुकसान झाले आहे.

Vehicles wreckage in pimpri chinchwad
पिंपरी चिंचवडमध्ये वाहनांची तोडफोड

By

Published : May 31, 2020, 2:11 PM IST

पुणे - पिंपरी-चिंचवड शहरात पहाटेच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी चार वाहनांची तोडफोड केली आहे. यात मोठ्या प्रमाणावर वाहनांचे नुकसान झाले असून काचा फोडण्यात आल्या आहेत. या घटने प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप वाहने फोडण्याचे कारण अस्पष्ट असून तोडफोड करणारे फरार झाले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरातील नेहरू नगर परिसरात पहाटेच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांनी वाहनांची तोडफोड केली आहे. यात चार वाहनांचा समावेश असून मोठ्या प्रमाणावर वाहनांचे नुकसान झाले आहे. तक्रार देण्यास अद्याप कोणीही पुढे आले नसून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची, माहिती पिंपरी पोलिसांनी दिली आहे.

काही दिवसांपासून वाहनांना लक्ष करून त्याची तोडफोड करण्याची मानसिकता वाढली आहे. त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढल्याचे दिसत आहे. यापूर्वी किरकोळ वादातून चिंचवड परिसरात अज्ञातांनी काही वाहनांची तोडफोड केली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details