पुणे - पोलिसात तक्रार दिल्याच्या रागातून तीन जणांच्या टोळक्याने वाहनांची तोडफोड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हडपसर पोलिसांनी याप्रकरणी एकाला ताब्यात घेतले असून दोघांचा शोध सुरू आहे. सोमवारी रात्री हा प्रकार घडला.
पुण्यात वाहनांच्या तोडफोडीचे सत्र सुरूच हेही वाचा -चंद्रकांत पाटलांच्या वतीने कोथरूडमध्ये महिलांना साड्या वाटप; मनसे करणार तक्रार दाखल
पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन दिवसांपूर्वी दोन गटात किरकोळ कारणावरून वाद झाले होते. त्यातील एकाने याप्रकरणी पोलिसात तक्रार दिली होती. याच रागातून तीन जणांच्या टोळक्याने सोमवारी रात्री नवीन म्हाडा कॉलनीतील 5 ते 6 दुचाकींची तोडफोड केली. घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी तोडफोड करणाऱ्यांपैकी एकाला अटक केली असून उर्वरित दोघांचा शोध सुरू आहे.
हेही वाचा -'मानलेलं जरी असलं, तरी रक्ताच्या नात्याहून कमी नसतं; धनंजय मुंडेंची फेसबूक पोस्ट
दरम्यान, काही दिवसांपासून पुण्यात गाड्या तोडफोडीचे सत्र सुरू आहे. किरकोळ कारणावरून रस्त्यावर उभ्या असणाऱ्या दुचाकींना लक्ष केले जात आहे. रविवारी येरवडा परिसरातही काही दुचाकींची तोडफोड करण्यात आली होती.