पुणे - जिह्यामध्ये मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळला असून या पावसामुळे कृष्णा आणि भीमा खोऱ्यातील धरणांमधील पाणी साठ्यामध्ये वाढ झाली आहे. यामुळे अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आाला आहे.
मुसळधार पावसाने धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ; पाण्याचा विसर्ग सुरू - water reserves increase
वीर धरणाप्रमाणेच चासकमान धरणातून भीमा नदीला 5510 क्यूसेकवरून 10550 क्यूसेक पाण्याचा विसर्ग आला आहे.
मुसळधार पावसाने धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ; पाण्याचा विसर्ग सुरू
पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसातील पावसामुळे वीर धरण 93.20 टक्के इतके भरले आहे. सद्य स्थितीत धरणात 9.195 टीमसी पाणीसाठा आहे. तसेच सध्या धरणामध्ये 11563 क्यूसेक पाणी येत आहे. यामुळे धरणाच्या सांडव्याद्वारे नीरा नदीमध्ये 4600 क्यूसेक इतका विसर्ग सोडण्यात आला आहे.
वीर धरणाप्रमाणेच चासकमान धरणातून भीमा नदीला 5510 क्यूसेकवरून 10550 क्यूसेक पाण्याचा विसर्ग आला आहे.