पिंपरी-चिंचवड - दुर्मिळ आजाराने ग्रस्त असलेल्या अकरा महिन्याच्या वेदिकाने रविवारी जगाचा निरोप घेतला. तिला जून महिन्यात 16 कोटींचे इंजेक्शन देण्यात आले होते. ही सर्व रक्कम क्राऊड फंडिंगद्वारे जमा करण्यात आली होती. वेदिकाच्या आई वडिलांनी मोठे कष्ट घेतले होते. मात्र, तिचा रविवारी सायंकाळी मृत्यू झाला.
लोकनिधी व सीएसआरमार्फत पैसे जमवले -
वेदिका सौरभ शिंदे ही SMA TYPE 1 या दुर्मिळ आजाराने ग्रस्त होती. तिला zolgensma ही लस अमेरिकेतून आयात करून जून महिन्यात देण्यात आली होती. वेदिका अवघ्या ८ महिन्यांची असताना तिला SMA TYPE 1 हा दुर्मिळ आजार झाला असल्याचे निदर्शनास आले. या आजारावर zolgensma ही लस देणे गरजेचे होती. त्याप्रमाणे एका सामान्य कुटुंबातील वेदिकाचे वडील सौरभ आणि स्नेहा शिंदे यांनी जीवाचे रान करून तब्बल 16 कोटी रुपये लोकनिधी व सीएसआर मार्फत जमा केले. ज्या दात्यांनी आपल्या आपल्या परीने जेवढी शक्य होईल तेवढी मदत केली होती. मात्र, अखेर वेदिकला मृत्यूने गाठले आणि रविवारी सायंकाळी तिचा मृत्यू झाला.
दरम्यान, या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा -'झिका'चा पहिला रुग्ण आढळला, मात्र चिंतेचे कारण नाही; वाचा, आरोग्यमंत्री काय म्हणाले?