आळंदी (पुणे) - वट पौर्णिमेनिमित्ताने संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात पहाटे समाधीवर दुग्धअभिषेक करत महाआरती करण्यात आली. विनामंडप व समाधी मंदिरात (गाभाऱ्यात) विविध रंगाच्या फुलमाळांनी सजविण्यात आलं आहे. समाधी मंदिरातील दृश्य अत्यंत विलोभनीय असून प्रत्येक सणाच्या निमित्ताने माऊलींच्या गाभाऱ्याला फुलांची आकर्षक सजावट केली जाते. माऊली मंदिरात केलेली ही सजावट पाहण्यासाठी दरवर्षी असंख्य भाविक याठिकाणी दाखल होत असतात. परंतु, यावर्षी कोरोनाचं सावट असल्यामुळे यंदा भाविकांना घरातूनच ऑनलाइन दर्शन घ्यावं लागत आहे. देवस्थानं बंद असले तरी मंदिरांमध्ये पूजा, फुलांची आरास अशा विधी नित्यनेमाने सुरू असल्याची माहिती देवस्थान समितीचे व्यवस्थापक माऊली विर यांनी दिली आहे.
वट पौर्णिमेनिमित्ताने संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट
हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेचा हा दिवस "वटपौर्णिमा" म्हणून साजरा केला जातो. वट पौर्णिमेनिमित्ताने संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात पहाटे समाधीवर दुग्धअभिषेक करत महाआरती करण्यात आली. विनामंडप व समाधी मंदिरात (गाभाऱ्यात) विविध रंगाच्या फुलमाळांनी सजविण्यात आलं आहे. समाधी मंदिरातील दृश्य अत्यंत विलोभनीय असून प्रत्येक सणाच्या निमित्ताने माऊलींच्या गाभाऱ्याला फुलांची आकर्षक सजावट केली जाते.
हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेचा हा दिवस "वटपौर्णिमा" म्हणून साजरा केला जातो. विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात. अनेक ठिकाणी हे व्रत जेष्ठ अमावस्येच्या दिवसापासून ते जेष्ठ पौर्णिमेच्या तिथीपर्यंत केले जाते. वटवृक्षाची पूजा करुन सावित्रीने आपला पती सत्यवान यांच्या प्राणाची रक्षा केली होती अशी आख्यायिका आहे. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे. दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. सर्वात पवित्र मानल्या जाणाऱ्या वटवृक्षाची पूजा करुन स्त्रिया “मला आणि माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभू दे, धनधान्य आणि मुले-नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित आणि संपन्न होऊ दे”, अशी प्रार्थना करतात.
हेही वाचा -Delta Plus: जळगाव जिल्ह्यात मे महिन्यातच 'डेल्टा प्लस'चे रुग्ण झाले बरे - जिल्हाधिकारी