पुणे- देवाच्या आळंदीवरून मंगळवारी पालखी प्रस्थान होत असताना इंद्रायणी घाटावर वासुदेवाचे आगमन झाले आहे. मोठ्या भक्तीभावाने हा वासुदेव वारकऱ्यांना आशिर्वाद देताना भजनांमधून वारकरी व भाविकांचे मनोरंजन करत आहे.
तुम्ही वासुदेव, वासुदेव म्हणा...कान तृप्त करणारे वासुदेवांचे भजन
इंद्रायणी घाट हा भक्तिमय वातावरणाने वाहून गेला आहे. त्यामध्ये वासुदेवाच्या गीतांची भर पडत आहे.
इंद्रायणी घाट हा भक्तिमय वातावरणाने वाहून गेला आहे. त्यामध्ये वासुदेवाच्या गीतांची भर पडत आहे. आळंदीत दाखल होणारा वारकरी भाविक या वासुदेवांना देणगीच्या रूपात काही मोबदला देत असतो. त्यातून हा वासुदेव या वारकऱ्यांना आशीर्वाद देऊन सुख शांती लाभो असे सांगतो. ही वासुदेवाची परंपरा वारीच्या अखंड काळापासून चालत आली आहे.
ज्ञानेश्वर माऊलींच्या वारीमध्ये वासुदेवाचे एक वेगळे स्थान आहे. यातूनच हा वासुदेव माउलींच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होऊन पंढरीच्या दिशेने निघणार आहे.