पुणे- देवाच्या आळंदी नगरीमध्ये आषाढी वारीचा भक्तिमय सोहळा रंगला आहे. वारी सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या दिंड्या इंद्रायणी काठावरती येऊन आपल्या गोड वाणीतून अभंगवाणीतून माऊलींचे स्मरण करत आहे.
इंद्रायणीकाठी लोटला भक्तीचा महासागर; विठुरायाच्या नामस्मरणात वारकरी दंग - rukhumai
नव जोशात व नव चैतन्यातून आज आषाढी वारी सोहळ्याला सुरुवात होत असताना मोठ्या उत्साहात वारकरी नाचत बागडत पंढरीच्या दिशेने जाणार आहे.
भक्तीचा हा वारकरी सोहळा होत असताना इंद्रायणी काठावर राज्य परराज्यातून अनेक वारकरी भाविक माऊलींच्या नगरीमध्ये दाखल झाले आहेत. इंद्रायणी काठावरती आपल्या गोड वाणीतून संतांच्या कौतुकाचा हा सोहळा पंढरीच्या दिशेने जाण्यासाठी वेगवेगळ्या अभंगातून मांडला जात आहे.
भक्तिमय वातावरणात रंगलेला हा सोहळा आज सायंकाळी पालखी प्रस्थानानंतर पंढरीच्या दिशेने निघणार आहे. नव जोशात व नव चैतन्यातून आज आषाढी वारी सोहळ्याला सुरुवात होत असताना मोठ्या उत्साहात वारकरी नाचत बागडत पंढरीच्या दिशेने जाणार आहे. जो आजचा उत्साह आहे. तोच उत्साह पंढरीच्या वाटेवर जाताना राहणार आहे.