महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

संजीव पुनाळेकरांच्या निर्दोष सुटकेसाठी विविध हिंदुत्ववादी संघटनांचा पुढाकार.. - हिंदू जनजागृती संस्था

एडवोकेट संजीव पुनाळेकर यांना षडयंत्र करून अटक करण्यात आल्याचा आरोप करत ते निर्दोष असून त्यांची सुटका करावी अशी मागणी विविध हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे.

संजीव पुनाळेकरांच्या निर्दोष सुटकेसाठी विविध हिंदुत्ववादी संघटना पुढे..

By

Published : Jun 6, 2019, 5:34 PM IST

पुणे - डॉक्टर दाभोलकर हत्या प्रकरणात अॅड. संजीव पुनाळेकर यांना अटक करण्यात आली. त्यानंतर आता पुनाळेकरांच्या समर्थनासाठी सनातन संस्था, हिंदू जनजागृती संस्थेसह विविध हिंदुत्ववादी संघटना समोर आल्या आहेत. संजीव पुनाळेकर यांना षडयंत्र करून अटक करण्यात आल्याचा आरोप करत ते निर्दोष असून त्यांची सुटका करावी, अशी मागणी या संघटनांनी केली आहे.

संजीव पुनाळेकरांच्या सुटकेसाठीच्या मागण्या करिता जमलेले कार्यकर्ते


पुरोगाम्यांच्या दबावाखाली ही कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच सीबीआयच्या अधिकाऱ्याविरोधात पुनाळेकर यांनी केलेल्या तक्रारीमुळे सीबीआयने पुनाळेकर यांना अटक करण्यात आली, असा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केला आहे.


सनातन संस्थेतसह विविध संघटनांनी गुरुवारी पुण्यात पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे. पुनाळेकर यांना झालेल्या अटकेमुळे देशभरातल्या हिंदुत्ववादी संघटनांमध्ये रोष असून पुनाळेकर यांच्या समर्थनासाठी देशभर आंदोलन केली जातील. रस्त्यावर उतरून या गोष्टीचा निषेध केला जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details