पुणे- दरवर्षी 31 मार्च रोजी जागतिक वनदिन साजरा केला जातो. या दिवसाच्या निमित्ताने वनीकरण व पर्यावरणाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या वनराई संस्थेच्यावतीने एका नव्या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. 3E म्हणजेच परिसंस्था पर्यावरण अर्थव्यवस्था आणि सक्षमीकरण या उपक्रमाद्वारे गावपातळीवर आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देण्याबरोबरच त्या भागांचे नैसर्गिक अधिवास जतन करणे. तसेच तेथील सर्वार्थाने सुबत्ता वाढवणे हे या उपक्रमाचे वैशिष्ट्य असणार असल्याची माहिती वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया यांनी दिली.
जमिनीला उत्पादनक्षम बनवण्यासाठी आग्रही भूमिका
हरित भारतासाठी जन आंदोलन उभे करण्याच्या ध्यासातून सन 1986 मध्ये पद्मविभूषण डॉक्टर मोहन धारिया यांनी वनराई संस्थेची स्थापना केली. पडीक जमिनीच्या गंभीर समस्येकडे वनराईने देशाचे सर्वप्रथम लक्ष वेधले आणि या जमिनीला उत्पादनक्षम बनवण्यासाठी आग्रही भूमिका घेतली. शिवाय लोकसहभागातून वाणीकरण्यासह पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबविले.आणि देशाच्या धोरणकर्त्यांना नाही त्यासाठी प्रवृत्त केले. श्रमदानातून पाणी अडवण्यास मुरवण्यासाठी वनराई बंधाऱ्याची चळवळ उभी केली. पडीक जमिनीच्या विकासाकरिता डॉक्टर मोहन धारिया यांच्या अध्यक्षतेखाली भारत सरकारने नेमलेल्या उच्चस्तरीय समितीचा अहवाल बनविण्यातही वनराईने कळीची भूमिका घेतली. याशिवाय वृक्ष लागवडीमध्ये प्राधान्याने चिंच,आवळा,जांभूळ,गावठी सीताफळ,कवट,बोर,करवंद आणि बांबू अशा आर्थिक उत्पन्न देणाऱ्या झाडांना प्राधान्य देण्यात येणार आहे.