पुणे - राज्यात एकीकडे मराठा आरक्षणाचा विषय पेटला असताना आता वंजारी समाजाने देखील आपल्याला 2 टक्क्यांवरून 10 टक्के आरक्षण करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. समाजाच्या विविध प्रश्नांसाठी सकल वंजारी समाज समन्वय समिती तयार करण्यात आली असून या माध्यमातून विविध मागण्या करण्यात आले आहे.
गोपीनाथ गडावर आरक्षण मेळावा घेणार
राज्यात वंजारी समाजाची लोकसंख्या दीड ते दोन कोटी असून 2 टक्के आरक्षणाने समाजावर प्रचंड अन्याय होत आहे. मेडिकल, इंजिनिअरिंग, स्पर्धा परीक्षासाठी मुलांना अनेक अडचणी येत आहेत. येत्या काळात भगवान गडावर आरक्षण मेळावा घेण्यात येणार असून मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती सकल वंजारी समाज समन्वय समितीचे मुख्य समन्वयक फुलचंद कराड यांनी दिली.
गोपीनाथ मुंडे महामंडळ कार्यान्वित करण्यात यावा