पुणे- येथील गाड्यांच्या तोडफोडीचे सत्र सुरुच आहे. दत्तवाडी परिसरात जनता वसाहतीजवळ 15 गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. यामुळे गाड्या फोडणाऱ्यांची चांगलीच दहशत परिसरात पसरली आहे. या प्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
पुण्यात गाड्यांची तोडफोड सुरुच;दत्तवाडीत 15 गाड्या फोडल्या - Vandalism
दत्तवाडी परिसरात जनता वसाहतीजवळ 15 गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे.यामुळे गाड्या फोडणाऱ्यांची चांगलीच दहशत परिसरात पसरली आहे.
दत्तवाडीत 15 गाड्यांची तोडफोड
दत्तवाडीतील आंबिल ओढा परिसरात रात्री ११ च्या सुमारास 15 गाड्यांची तोडफोड करण्यात आली. रात्री ११ च्या सुमारास तोंडाला रुमाल बांधलेल्या 4 तरुणांनी दहशत पसरवण्याच्या हेतूने ही तोडफोड केली असल्याचा अंदाज आहे. यापूर्वीही दत्तवाडीत असे अनेक प्रकार घडले आहेत. त्यामुळे अशा गुंड प्रवृत्तीच्या तरुणांवर चाप कधी लागणार? हा प्रश्न स्थानिक उपस्थित करत आहेत.