पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री यांना जामीन मंजूर झाला असून आज ते जेलमधून बाहेर येणार आहे. यावर काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ( Prithviraj Chavan ) यांनी आपल मत व्यक्त केलं आहे. ते म्हणाले की, सध्या राज्यात न्याय व्यवस्थेचा ( justice system ) गौर वापर चालला आहे. अनिल देशमुख ( Anil Deshmukh ) यांना दीड वर्ष आत ठेवलं. नवाब मलिक अजूनही आत मध्ये आहे. खटला दाखल न करता फक्त हे सरकार ( Prithviraj Chavan criticizes Shide BJP government ) दाबून ठेवत आहे. हे राजकीय हत्यार म्हणून वापरल जात आहे. हे खूप दुर्दैवी असल्यास मत पृथ्वीराज चव्हाण ( Prithviraj Chavan criticizes Shinde government ) यांनी व्यक्त केला.
भरत जाधव यांना विश्व जागतिक जीवनगौरव पुरस्कार -संभाजी ब्रिगेडतर्फे आज बुधवारी गणेश कला क्रिडा रंगमंचाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या रौप्यमहोत्सवी महाधिवेधशानाचे उदघाटन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्ष स्थानी खासदार श्रीनिवास पाटील होते उदघाटनाच्या कार्यक्रमात संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, श्रीमंत भूषणसिंहराजे होळकर तंजावर चे युवराज संभाजी राजे भोसले, चित्रपट अभिनेते भरत जाधव, अशोक समर्थ, लेखक अरविंद जगताप उपस्थित होते. यावेळी चव्हाण यांच्या हस्ते भरत जाधव याना विश्व जागतिक जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. तर, अशोक समर्थ यांचाही सन्मान करण्यात आला शाल,फणसाचे रोप, सन्मानपत्र, शिवाजी महाराज व संभाजी महाराजांची शिल्प असे या पुरस्काराचे स्वरूप आहे