पुणे- देशातील सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत 761 उमेदवार उत्तीर्ण झाले आहे. शुभम कुमार याने देशात पहिला क्रमांक पटकाविला आहेत. हा निकाल लोकसेवा आयोगाने जाहीर केला आहे. लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पुण्याची मृणाली जोशी ही राज्यात प्रथम आली आहे. तर देशात 36 व्या क्रमांकाचा मान मृणाली हिने पटकावला आहे.
UPSC Result: राज्यातून पहिली येणाऱ्या मृणाली जोशीने सांगितले यशाचे गमक
मला आई - वडिलांनी माझ्या आवडीप्रमाणे शिक्षण घेण्याची संधी दिली. यामुळे मला आज सनदी अधिकारी म्हणून लोकसेवा करायची संधी मिळाली आहे. आज माझं जे काही यश आहे त्याचे श्रेय माझे आई वडीलांना जातं, अशी भावना यावेळी मृणाली जोशी हिने व्यक्त केली.
UPSC Result: राज्यातून पहिली येणाऱ्या मृणाली जोशीने सांगितले यशाचे गमक
मृणाली जोशी हिचे शिक्षण अभिनव महाविद्यालयात झाले असून कॉलेज फर्ग्युसन महाविद्यालयात झाले आहे. मला आई - वडिलांनी माझ्या आवडीप्रमाणे शिक्षण घेण्याची संधी दिली. यामुळे मला आज सनदी अधिकारी म्हणून लोकसेवा करायची संधी मिळाली आहे. आज माझं जे काही यश आहे त्याचे श्रेय माझे आई वडीलांना जातं, अशी भावना यावेळी मृणाली हिने व्यक्त केली.मृणालीने हे यश वयाच्या चोविसाव्या वर्षी मिळवले आहे. विशेष म्हणजे मृणालीने दुसऱ्या प्रयत्नात यश प्राप्त केले आहे.
मृणालीचे वडील अविनाश जोशी आणि मीनल जोशी हे दोघेही आयआयटीआयन आहेत. वाचन, लेखन, चित्रकला स्व अभ्यास अशा छंदामुळे हे यश मिळाले आहे. यूपीएससी हे एन्ड ऑफ एक्सेल नसून प्रोसेस एन्जॉय केलं पाहिजे. तसेच एकूण आपले छंद जोपासणे आणि सोशल सर्कल जोपासणे हे खूप महत्त्वाचे आहे आणि काही न काही शिकत राहायला हवं. कारण यामुळे आपल्याला ऑप्शन मिळत असतो आणि त्यामुळे नैराश्य येत नाही, असा सल्लाही यावेळी मृणाली हिने दिला.
विशेषता: महिलांसाठी काम करायला आवडेल
पुढे जाऊन प्रशासकीय सेवेत काम करायचं आहे. विशेष म्हणजे पुढे जाऊन मला महिलांसाठी काम करायला आवडेल. तसेच पर्यावरण आणि शिक्षण याही क्षेत्रात काम करायला आवडेल. तसेच जे पद मिळेल जी जबाबदारी मिळेल ती पूर्णपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन, असेही यावेळी मृणाली जोशी हिने सांगितलं.