महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'अनावश्यक स्टेरॉइडचा वापर म्यूकरमायकोसिसला कारणीभूत' - म्युकरमायकोसिस महाराष्ट्र रूग्ण

कोरोनानंतर आता म्यूकरमायकोसिस आजाराने थैमान घातले आहे. महाराष्ट्रातील शहरांसह ग्रामीण भागातही या आजाराचे रूग्ण आढळत आहेत. कोरोना रूग्णांना हा आजार होत आहे. पण, जर स्टेरॉइडचा वापर प्रमाणात केला तर म्यूकरमायकोसिसपासून बचाव होईल, असे मत साथरोग तज्ज्ञ डॉक्टर अमित द्रविड यांनी म्हटले आहे.

pune
पुणे

By

Published : May 13, 2021, 9:06 PM IST

पुणे - कोरोना आजाराचा कहर राज्यभर सुरू आहे. आता म्यूकरमायकोसिस या आजाराने डोके वर काढले आहे. ग्रामीण भागातही या आजाराचे रूग्ण आढळू लागले आहेत. अति आणि अनावश्यक स्टेरॉइडचा मारा या परिस्थितीला कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे आता कोरोनावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी स्टेरॉइडचा आवश्यक तिथेच वापर करणे गरजेचे आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.

महिन्याला 30 ते 40 रुग्ण

म्यूकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराचे रुग्ण सध्या वाढत आहेत. कोरोनाच्या जीवघेण्या आजारातून वाचल्यानंतर बरे होऊन बाहेर पडलेल्या काही रुग्णांना आता म्यूकरमायकोसिस या आजाराचा सामना करावा लागत आहे. यात काही रुग्णांनी आपले डोळेदेखील गमावल्याचे समोर आले आहे. पुणे शहरात एका मोठ्या रुग्णालयात सामान्य स्थितीमध्ये म्यूकरमायकोसिसचे साधारण 5 ते 6 रुग्ण वर्षाला येत होते. मात्र, आता एका महिन्यातच म्यूकरमायकोसिसचे 30 ते 40 रुग्ण दाखल होत आहेत. त्यामुळे ही धोक्याची घंटा असल्याचे मानले जात आहे.

'डॉक्टरांना समजावण्याची गरज'

'कोरोना रुग्णांना सर्रास स्टेरॉइड दिले जात आहेत. गरज नसतानाही होणाऱ्या स्टेरॉइडच्या भरमसाठ वापरामुळे कोरोना रुग्ण म्यूकरमायकोसिस संसर्गाला बळी पडत असल्याचे विदारक चित्र सध्या दिसून येत आहे, असे साथरोग तज्ज्ञ डॉक्टर सांगतात. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात घबराट पसरली आहे. वैद्यकीय पातळीवरदेखील ही बाब जाणवत आहे. दुसऱ्या लाटेतील कोरोनाच्या जीवघेण्या स्वरूपामुळे कोरोना रुग्णांना सर्रास स्टेरॉइड दिले जात आहेत. घरी उपचार घेणाऱ्या, ऑक्सिजनची गरज नसलेल्या रुग्णांनाही स्टेरॉइड दिले जात आहे. यात बऱ्याचदा स्ट्रॉंग स्टेरॉइड दिले जातात. त्याचा परिणाम म्यूकरमायकोसिस होण्यात दिसून येत आहे. कोरोना झालेल्या आणि मधुमेह असलेल्या रुग्णामध्ये याचे प्रमाण अधिक आहे. हा म्यूकरमायकोसिस आजार रुग्णाच्या शरीरात अतिशय वेगाने पसरतो. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करताना अनावश्यक स्टेरॉइडचा वापर थांबला पाहिजे', असे साथरोग तज्ज्ञ डॉक्टर अमित द्रविड यांनी म्हटले आहे.

हेही वाचा -'कोरोना एक प्राणी असून त्यालाही जगण्याचा अधिकार'

ABOUT THE AUTHOR

...view details