महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुणे : अश्लील चित्रफीत दाखवून महिलेवर अनैसर्गिक अत्याचार - पुणे गुन्हे वार्ता

अश्लील चित्रफीत दाखवून अघोरी पद्धतीने अनैसर्गिक अत्याचार केल्याची तक्रार एका वानवडी पोलिसांत दाखल केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे.

unnatural act with women by showing pornographic videos in pune
पुणे : अश्लील चित्रफित दाखवून महिलेवर अनैसर्गिक अत्याचार

By

Published : Feb 5, 2021, 1:01 PM IST

Updated : Feb 5, 2021, 1:15 PM IST

पुणे -पतीने अश्लील चित्रफीत दाखवून अघोरी पद्धतीने अनैसर्गिक अत्याचार केल्याची तक्रार एका 44 वर्षीय महिलेने वानवडी पोलिसांत दाखल केली आहे. यासंर्भात पोलिसांनी 48 वर्षीय पतीला अटक केली आहे. पुण्यातील कोथरूड परिसरात हा प्रकार घडला.

महिलेचा मानसिक आणि शारीरिक छळ -

24 वर्षांपूर्वी या दाम्पत्याचे लग्न झाले होते. त्यांना एक मुलगीही आहे. लग्न झाल्यापासून पतीने इच्छा नसतानाही तिच्यासोबत बळजबरीने शरीरसंबंध ठेवले. तसेच अनेकवेळा अनैसर्गिक पद्धतीने अश्लील चित्रफीत दाखवून महिलेच्या इच्छेविरुद्ध अघोरी पद्धतीने शरीरसंबंध ठेवले. तसेच तिच्या इच्छेविरुद्ध गर्भपात करून तिचा वेळोवेळी शारीरिक आणि मानसिक छळ केला, असे त्या महिलेने तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे.

हेही वाचा - शिवसेना भाजपा आमने-सामने; इंधन दरवाढी विरोधात शिवसेना तर वीज बिला विरोधात भाजपा रस्त्यावर

Last Updated : Feb 5, 2021, 1:15 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details