आंबेगाव (पुणे) - लोणी धामणी येथे शनिवारी सायंकाळी मारूती सुझुकी कंपनीच्या कारने अचानक पेट घेतला. या आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली. ही आग बघण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात घटनास्थळी गर्दी केली होती. ही पेट घेतलेली कार कोणाची आहे, याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही. मंचर पोलिस याप्रकरणी तपास करत आहेत.
लोणी धामणी रस्त्यावर अज्ञाताची कार जळून खाक; आगीचे कारण मात्र अस्पष्ट - ambegao unknown car burnt
लोणी धामणी येथे शनिवारी सायंकाळी मारूती सुझुकी कंपनीच्या कारने अचानक पेट घेतला. या आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली. ही आग बघण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात घटनास्थळी गर्दी केली होती.
अज्ञात कार जळुन खाक
हेही वाचा- कॉमेडियन भारती सिंह आणि हर्ष लिंबाचीया यांना पोलिसांनी केले न्यायालयात हजर
लोणी धामणी रस्त्याजवळ शियाज कारने पेट घेतला. त्यामुळे परिसरातील नागरिक घटनास्थळी दाखल झाले. मात्र गाडीत व परिसरात एकही व्यक्ती नसल्याने गाडीला आग कशी लागली यावर तर्कवितर्क सुरू झाले. तीन तासांत संपूर्ण गाडी जळून खाक झाली. या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी मंचर पोलिसांना दिली. मंचर पोलीस गाडी मालकाचा शोध घेत आहेत.हेही वाचा -पुणे जिल्ह्यात दोन सख्ख्या बहिणींवर लैंगिक अत्याचार, जवळच्या नातेवाईकाला अटक