जुन्नर(पुणे)- तालुक्यातील शिरोली खुर्द येथील एका शेतकऱ्याने 700 पिशवी कांदा साठवून ठेवला आहे. मात्र, या कांद्यात रात्रीच्या सुमारास अज्ञातांनी युरिया खत टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. युरियाने कांदा सडला असून यात शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. गणेश मोरे, असे शेतकऱ्याचे नाव आहे.
700 पिशवी साठवलेल्या कांद्यात युरिया, शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान - जुन्नूर शेतकरी कांदा बातमी
गणेश मोरे यांनी शेतात पिकवलेला कांदा भविष्यात वाढीव भाव मिळेल या आशेने साठवून ठेवला आहे. मात्र, अज्ञात व्यक्तीने या काद्यांत युरिया खत टाकला असल्याचे समोर आले आहे. युरियाने कांदा पूर्णपणे सडला असून गणेश यांचे यात मोठे नुकसान झाले आहे.
![700 पिशवी साठवलेल्या कांद्यात युरिया, शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान unknown-put-urea-in-onion-stock-at-junnar-pune](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-8152843-thumbnail-3x2-pune.jpg)
गणेश मोरे यांनी शेतात पिकवलेला कांदा भविष्यात वाढीव भाव मिळेल या आशेने साठवून ठेवला आहे. मात्र, अज्ञात व्यक्तीने या काद्यांत युरिया खत टाकले असल्याचे समोर आले आहे. युरियाने कांदा पूर्णपणे सडला असून गणेश यांचे यात मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच कृषी विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पंचनामा केला आहे.
सध्या कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनने कांद्याची विक्री घटली आहे. त्यामुळे वाढीव भावाच्या आशेने गणेश यांनी कांद्याची साठवणूक करुन ठेवली होती. जवळपास 700 पिशवा हा कांदा असल्याची माहिती गणेश यांनी दिली. दरम्यान, याप्रकरणी पोलिसात तक्रार देणार असल्याचे गणेश मोरे यांनी सांगितले.