पुणे - मंचर उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या डॉ.महेश घुडे व त्यांची पत्नी डॉ.अलकनंदा घुडे हे दोघेही मागील दिड महिन्यांपासून शहरातील नायडू रुग्णालयात कर्तव्य पार पाडत होते.
मंचर उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर पती-पत्नीचा अनोखा सन्मान सोहळा पार पडला कोरोना रुग्णांवर यशस्वी उपचार केल्यानंतर हे दाम्पत्य मंचर उपजिल्हा रुग्णालयात आपल्या मूळ ठिकाणी कामावर दाखल झाले. यानंतर मंचर उपजिल्हा रुग्णालयातील सहकारी डॉक्टरांकडून त्यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली. टाळ्यांच्या गजरात या दाम्पत्याचे जंगी स्वागत झाले.
कोरोनाच्या महामारीवर यशस्वी मात करण्यासाठी डॉक्टरांची महत्वाची भूमिका पार पाडली. पुण्यातील नायडू रुग्णालयात त्यांनी दिड महिना सेवा पुरवल्यानंतर अखेर ते परतले आहेत. यामुळे त्यांचा कौतुक सोहळा भरवण्यात आला. या कामगिरीचे कौतुक करण्यासाठी मंचर उपजिल्हा रुग्णालय सजवण्यात आले होते.
पराग उद्योग समुहाचे संचालक देवेंद्र शहा यांनी डॉ.महेश घुडे व पत्नी डॉ.अलकनंदा घुडे यांचे पुष्पहार घालून स्वागत केले.