पुणे : पुण्यातील वाहतूक कोंडी (Traffic jam in Pune) कमी करण्यासाठी 50 हजार कोटी रुपयांचे पूल बांधण्याची घोषणा केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Union Transport Minister Nitin Gadkari) यांनी केली आहे. पुण्यातील एनडीए चौक (Nitin Gadkari inaugurated the bridge at Chandni Chowk) येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वरील एकात्मिक पायाभूत सुविधा तसेच रस्ते विकास प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी गडकरी बोलत होते.
गडकरी यांच्या हस्ते रस्त्याचे लोकार्पण : खेड तसेच गडकरी यांच्या हस्ते खेड, मंचर रस्ता चौपदरीकरणाचे लोकार्पण देखील करण्यात आले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar), राज्याचे उच्च, तंत्रशिक्षण मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील (Guardian Minister Chandrakantada Patil), विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे (Legislative Council Deputy Speaker Dr Neelam Gorhe) आदींची उपस्थिती होती.
पुण्याला चोवीस तास पाणी :पुणे महाराष्ट्रातील सर्वात वेगाने वाढणारे शहर आहे. भविष्यात शहर देशाच्या विकासाचे केंद्र बनेल, इथे अनेकांना रोजगार मिळेल, पुण्याला चोवीस तास पाणी तसेच चांगल्या रस्त्यांची गरज आहे. पुण्याच्या विकासासाठी भारत सरकार मदत करेल. पुण्यातील प्रकल्पांबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात येणार आहे, असे केंद्रीय मंत्री गडकरी म्हटले आहे. पुणे-सातारा महामार्गावरील दुमजली डबलडेकर पूल, हडपसर-यवत उन्नत मार्ग, पुणे-शिरूर-अहमदनगर ५६ किलोमीटरचा मार्ग, तळेगाव-शिक्रापूर-चाकण ५४ किलोमीटरचा मार्ग तसेच नाशिक फाटा ते खेड मार्गाचा प्रकल्प अहवाल तयार आहे. पुणे विभागात पावणे दोन लाख कोटी रुपयांचे प्रकल्प देण्यात आले असून त्यातील काही पूर्ण झाले आहेत. १२ हजार कोटींचे संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्ग डिसेंबर अखेर पूर्ण होतील असे असा दावा देखील नितीन गडकरी यांनी केला आहे.
शहरातील प्रदूषण कमी करा :पुढे बोलताना गडकरी म्हणाले की, चांदणी चौक प्रकल्पासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. मोठ्या प्रकल्पांवरील खर्च कमी करण्यासाठी तसेच वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे. पुण्यातील एअर बसेसचाही पर्याय म्हणून अभ्यास करायला हवा. पुण्यात ऑटो रिक्षांना नवीन परवाने देताना इलेक्ट्रिक, इथेनॉलवर चालणाऱ्या रिक्षांना परवाने दिल्यास प्रदूषण कमी होईल असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला आहे.
शहरातील प्रदूषण दूर करण्यावर भर : शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करून ग्रीन हायड्रोजन तयार करण्याचा विचार केला पाहिजे. पुण्यातील सर्व कचरा विलग करून पुणे रिंगरोडसाठी वापरल्यास कचऱ्याचा प्रश्न सुटेल. पुण्यातील प्रदूषित पाणी शुद्ध करून ते उद्योग, शेती, रेल्वेला पुरवल्यास जलप्रदूषण दूर होण्यास मदत होईल. शहरातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासोबतच शहरातील प्रदूषण दूर करण्यावर अधिक भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
गडकरींकडून अधिकाऱ्यांचे कौतुक : राज्य सरकारच्या नागरी विकास योजनेतून सोलापूर-पुणे, नाशिक शहरातील रस्ते प्रकल्पांसाठी भूसंपादन वेगाने करण्यात आले. चांदणी चौक प्रकल्पासाठीही या निर्णयाचा वापर करण्यात आला. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनीही चांगले काम केले असे कौतुक नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांचे केले आहे.
एकात्मिक वाहतूक व्यवस्था गरजेची -फडणवीस :पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यात प्रवाशांची संख्या वाढत आहे. पुणे मेट्रोने 'पुणे वन कार्ड'द्वारे चांगली सुरुवात केली आहे. हे कार्ड पीएमपीएमएलला लागू केल्यास त्याची उपयुक्तताही वाढेल. भविष्यात हे कार्ड देशातील इतर मोठ्या शहरांमध्येही वापरता येणार आहे. पुण्यात एकात्मिक वाहतूक व्यवस्था निर्माण करून, नागरिकांना 500 मीटरच्या आत वाहतुकीचे विविध पर्याय दिल्यास ते सार्वजनिक वाहतुकीचा अधिक वापर करतील. आता स्मार्ट यंत्रणा तयार होणार असल्याने वेळ, ठिकाण आणि प्रवाशांची संख्याही कळणार असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटेल आहे.