पुणे : स्वतः मंत्री असताना काय केले? त्याची चौकशी चालू आहे, असे म्हणत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अजित दादा पवार यांच्यावर आज पुण्यात टीका केली आहे.आदित्य ठाकरे यांच्यावर हल्ला झाला. विनायक राऊत हा सिंधुदुर्गला लागलेले कीड आहे असेसुद्धा त्याने म्हटले आहे. पत्रकार शशिकांत वारीसे हत्या प्रकरणांमध्ये त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी विनायक राऊत यांच्याबरोबरच संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. सामना पेपरचा खप कमी झाल्यानंतर काही बोलत असतो, अशी टीका सुद्धा नारायण राणे यांनी आज पुण्यात केलेली आहे.
नारायण राणे गरजले: कोकणात पत्रकार शशिकांत वारीसे यांची हत्या झाली आहे की अपघात, याची चौकशी करण्याची मागणी संजय राऊत आणि विनायक राऊत यांनी केलेली आहे. त्यावर बोलताना मी शशिकांत वारीसे यांना कधीही बोललेलो नाही, भेटलेलो नाही आणि अंगणवाडीत कार्यक्रम झाल्यावर देवेंद्र फडवणीस यांनी धमकी दिल्याचा विरोधकांच्या आरोपावर नारायण राणे गरजले. आमचे देवेंद्रजी अशी धमकी कधीही देत नाहीत आणि आम्ही कोणीही दिलेली नाही, असे सुद्धा नारायण राणे यांनी म्हणून सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. पोलीस चौकशी चालू असून सत्य जे आहे ते समोर येईल त्यानंतर आपण बोलू, अशी सुद्धा प्रतिक्रिया नारायण राणे यांनी दिली आहे.