पुणे: 'मोदी ॲट ट्वेन्टी' या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील उपस्थित राहणार आहे. हा कार्यक्रम डिपी रोडवर पंडित फार्मवर होणार आहे. अशी माहिती यावेळी मुळीक यांनी दिली.
असा असेल दौरा : या दौऱ्यादरम्यान १९ फेब्रुवारीला शाह शिवनेरी किल्ल्यावर भेट देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा हे १८ फेब्रुवारीला दुपारी पुण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. त्यानंतर शाह यांचा पुण्यात मुक्काम आहे. १९ फेब्रुवारीला सकाळी शिवसृष्टीचे लोकार्पण झाल्यानंतर शाह शिवनेरी किल्ल्यावर जाण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. पुण्यातल्या दोन दिवसांच्या दौऱ्यानंतर शाह कोल्हापूरच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. कोल्हापूर शाह यांची सासुरवाडी असून दोन दिवसात विविध सार्वजनिक कार्यक्रम होणार आहेत.
मंत्री शाह यांचा कार्यक्रम कोथरूड मतदार संघात :कसबा पोट निवडणुकीच्या प्रचारासाठी अमित शाह हे पुण्यात येत आहे. यावर मुळीक म्हणाले की, कसबा पोट निवडणुकीच्या प्रचारासाठी अमित शाह हे उतरणार नाही. कार्यक्रम हा कोथरूड मतदार संघात होणार आहे. विरोधकांची त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे आणि त्यांना त्यांच्या पराभव कशी लागला आहे म्हणून अशा पद्धतीची टीका केली जात आहे, असे देखील यावेळी मुळीक म्हणाले.