पुणे : पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेले गुन्हे तसेच वाढत असलेल्या गुन्ह्यांचे स्वरूप पाहता शहरात गुन्हा करताना धाक राहिला आहे की नाही असा प्रश्न निर्माण होत आहे. पुण्यातील उरुळी कांचन मध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भाच्याने मामाच्या मुली बरोबर पळून जाऊन लग्न केले म्हणून मुलाच्या दोन बहिणींना उघडे करून मारहाण करण्यात आली. या प्रकरणी सहा जणांच्या विरोधात लोणीकाळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
काय आहे प्रकरण : ३० वर्षीय पीडित तरुणीने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात संबंधित घटनेत फिर्याद दिली आहे. ही घटना २६ ते २९ जानेवारी रोजी घडली आहे. फिर्यादी महिला आणि आरोपी हे नातेवाईक आहेत. आरोपी यांच्या नात्यातील युवतीस फिर्यादी तरुणीच्या भावाने पळवून नेल्याचा संशय आरोपींना होता. त्यातूनच आरोपींनी फिर्यादी तरुणी आणि तिच्या बहिणीचे अपहरण केले.