महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Bawankule On Uddhav Thackeray: बावनकुळेंची ठाकरेंच्या मुलाखतीवर टीका; म्हणाले उद्धव ठाकरेंची स्थिती ही मनोरुग्णासारखी... - उद्धव ठाकरेंची स्थिती ही मनोरुग्णासारखी

उद्धव ठाकरेंच्या सामनामधून प्रसिद्ध होणाऱ्या मुलाखतीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज (मंगळवारी) पुण्यातून प्रत्युत्तर दिले. उद्धव ठाकरे यांची स्थिती मनोरुग्णासारखी झालेली आहे. ते कुठल्याही पातळीवर जाऊन टीका करतात. राजकारणात असे टीका करणे योग्य नाही; परंतु त्यांचे त्यांना लखलाभ असो, असे ते म्हणाले.

Bawankule criticism Uddhav Thackeray
बावनकुळेंची ठाकरेंच्या मुलाखतीवर टीका

By

Published : Jul 25, 2023, 9:28 PM IST

उद्धव ठाकरे यांच्याविषयी चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया

पुणे :उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये आमचे सरकार खेकड्याने पाडले आणि ते खेकडे आता भाजपजवळ आहेत, अशी टीका केली होती. त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले. उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडवणीसांनी मोठ्या भावासारखे सांभाळले, याचा मी साक्षीदार आहे. परंतु आता त्यांची मनोरुग्ण होण्याकडे वाटचाल सुरूच आहे, अशी प्रतिक्रिया आज चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुण्यात दिलेली आहे. पुण्यामध्ये 'लोकसभेचा प्रवास' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी आठ लोकसभा मतदारसंघांचा आढावा पक्षातर्फे घेण्यात आला. त्यावेळी 2024 ला नरेंद्र मोदी हे पंतप्रधान व्हावेत, अशी जनतेची इच्छा आहे आणि त्यासाठी राज्यातील 45 जागांवर लोकसभा निवडणुका आम्ही जिंकू, असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळेंनी व्यक्त केला. त्यासाठीच आजही आढावा बैठक घेत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

युती आता 25 वर्षे टिकणार :आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये जागा वाटपावरून मोठा संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. परंतु आमच्यामध्ये कुठलाही संभ्रम नाही. अजित पवार आमच्यासोबत आले त्यावेळेस ते लोकसभेच्या, विधानसभेच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या सगळ्या शक्यता लक्षात घेऊनच आलेले आहेत. ही आमची युती आता 25 वर्षे टिकणार आहे. त्यामुळे कोणीही त्यात संभ्रम निर्माण करू नये, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली.

बारामतीत कुणाचा उमेदवार :अजित पवार हे भाजपसोबत गेल्याने बारामतीत कुणाचा उमेदवार असणार यावरसुद्धा प्रतिक्रिया देताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, तिन्ही नेत्यांमध्ये आता चांगला समन्वय असून त्यासाठी आम्ही समन्वय समिती नेमलेली आहे. त्याचबरोबर तालुका, जिल्हा आणि गाव स्तरावरसुद्धा समिती नेमण्यात येईल. मोठा भाऊ म्हणून आम्हाला या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागणार आहेत. त्याचबरोबर बारामती लोकसभेचा उमेदवार सांगणार नाही; परंतु बारामती लोकसभेचा उमेदवार हा युतीचा विजयी उमेदवार असेल, असा विश्वाससुद्धा बावनकुळेंनी व्यक्त केला आहे. अजित पवार मुख्यमंत्री होणार या शक्यतेवरसुद्धा बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, आमचे सर्वोच्च नेते देवेंद्र फडवणीस यांनी सांगितले की, एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री असतील. त्यामुळे कोणीही यामध्ये अजेंडा आणून आमच्यामध्ये संभ्रम निर्माण करू नये, असेही ते म्हणाले.

विरोधी पक्षनेत्यावरून कॉंग्रेसवर टीका :विरोधी पक्षनेत्यांवरून बावनकुळेंनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. काँग्रेसचे विरोधी पक्षाचे आमदारसुद्धा एकत्र सभागृहात नसतात. आता विरोधी पक्षनेता हा 'ब्लड टेस्ट' करून काँग्रेसला नेमावा लागेल इतकी दयनीय अवस्था काँग्रेसची झालेली आहे. काँग्रेसला आणखी किती नेते धोका देतील याची कल्पना आपल्याला भविष्यात येईल. जो आमच्या पक्षात येणार त्याला आम्ही घेणार, अशी प्रतिक्रिया देत काँग्रेसमध्ये बंड किंवा पक्षांतर होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. सरकारमध्ये राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या शब्दाला किंमत आहे. त्यांनी तोडफोड करण्यापेक्षा आंदोलनाच्या पद्धतीने जायला हवे. तसे केले तरी मार्ग सापडतात. राज ठाकरे यांच्या शब्दाला सरकारमध्ये किंमत आहे. त्यांनी सरकार पुढे मागणी केली तर ते योग्य होईल अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे.

हेही वाचा:

  1. Dhananjay Munde : महिनाभरापूर्वी सरकारवर तुटून पडायचे धनंजय मुंडे अन् आता...
  2. Nitesh Rane Taunts Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंच्या मुलाखत प्रसारणावर नितेश राणेंची टोलेबाजी; म्हणाले हास्यजत्रेचा दोन दिवस प्रोग्राम...
  3. Jayant Patil On Manipur Violence : सलग दोन महिने मणिपूर धगधगतंय, केंद्र सरकार मात्र निष्क्रिय - जयंत पाटील

ABOUT THE AUTHOR

...view details