अब्दुल सत्तार यांची प्रतिक्रिया पुणेAbdul Sattar on Uddhav Thackeray : ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर टीका केली होती. त्यावर शिवसेनेचे नेते तथा राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी टीका केलीय. 2019 मध्ये त्यांनी युतीचा निर्णय घेतला, तेव्हा मी शिवसेना पक्षात नव्हतो. त्यानंतर मी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला, असंही ते म्हणाले.
पौष्टिक तृणधान्य महोत्सवात माहिती घेताना सत्तार ठाकरे संभ्रम निर्माण करताहेत :उद्धव ठाकरेंनी काल केलेल्या आरोपात तथ्य नाही. शिवसेना पक्षप्रमुख म्हणून बाळासाहेब ठाकरे यांना आपण दैवत मानतो. मात्र, उद्धव ठाकरे जनतेमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं आहे. न्यायालय जो निर्णय देईल, तो आम्हाला मान्य असेल, असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलंय.
पौष्टिक तृणधान्य महोत्सवाची पाहणी करताना अब्दुल सत्तार पौष्टिक तृणधान्य महोत्सवाचं उद्घाटन :महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीनं गणेश कला क्रीडा रंगमंच स्वारगेट येथे आयोजित 'बाजरी (पौष्टिक तृणधान्य) महोत्सव-2024 चं उद्घाटन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते झालं. यावेळी ते बोलत होते. पवार साहेब ज्येष्ठ नेते असून मी त्यांच्याबद्दल बोलणं योग्य ठरणार नाही. मी स्थानिक कार्यकर्ता आहे. तसंच मी देखील रामभक्त असल्याचं सत्तार यांनी म्हटलंय.
शिंदेंनी 30 वर्षे मुख्यमंत्री राहावं :अमित शाहांच्या वक्तव्याबाबत अब्दुल सत्तार म्हणाले की, अमित शहांना 30 वर्षे सत्तेत राहावं असं वाटत असेल, मात्र त्याबाबत जनता निर्णय घेईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देखील 30 वर्षे मुख्यमंत्री राहावं, असं मला वाटत असल्याचं सत्तार यांनी सांगितलं.
कांदा खाणाऱ्याचाही विचार करावा :कांदा निर्यातबंदीबाबत दिल्लीत दोन बैठका झाल्या आहेत. त्यावेळी शेतकरी जगला पाहिजे, असं केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटलं होतं. मात्र, कांदा खाणाऱ्याचाही विचार केला पाहिजे. येत्या अधिवेशनात यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री निर्णय घेतील. हा देशाचा प्रश्न आहे, त्यामुळं आम्ही फक्त राज्य म्हणून केंद्र सरकारला विनंती करणार आहोत.
आव्हाडांचा बोलविता धनी दुसराच :राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्याबद्दल वक्तव्य केलं आहे. जितेंद्र आव्हाड यांना माझी हात जोडून विनंती आहे. त्यांनी असं वक्तव्य करून राज्यातील वातावरण खराब करू नये. तसंच जितेंद्र आव्हाडांचा बोलविता धनी दुसरा कोणी तरी असू शकतो, असं यावेळी सत्तार म्हणाले.
नवीन विधानभवन बांधण्यात येणार :यावेळी बोलताना अब्दुल सत्तार यांनी लोकसभेप्रमाणं नव्या विधानसभेची राज्यात बांधणी करण्याचे संकेत दिले आहेत. यासाठी विधानसभा अध्यक्ष प्रयत्नशील असल्याचं देखील त्यांनी म्हटंलय. याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. नविन महिला आमदारांची संख्या वाढणार आहे. त्यासाठी नवीन विधानभवन बांधण्यात येणार असल्याचं सत्तार यांनी सांगितलंय.
हेही वाचा -
- पत्रकार परिषदेच्या नावाने विधानसभा अध्यक्षांचा अवमान कराल, तर तुमच्यावर हक्कभंग येणार-राम कदम
- शिंदे गटाच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण; 'हे' दिले महत्त्वाचे निर्देश
- शरद पवार अयोध्येत रामलल्लाच्या दर्शनासाठी जाणार; मात्र ठेवली 'ही' अट