पुणे - खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात राजकीय नेत्यांची वैयक्तिक पातळीवर टीका सुरू झाली आहे. असे असताना शिवसेनेचे उमेदवार सुरेश गोरे यांना शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी त्यांच्या शैलीत पाठबळ देत टीकाकारांना लक्ष्य केले. "गोरे काले हुअे तो दिलवाले है",कारण टीका करणाऱ्यांना मन, ह्रदयच नसल्याची टीका त्यांनी केली. गोरे यांना मिशा नाही, मात्र तुमच्या खेड तालुक्याच्या विकासाची दिशा आहे, अशा शब्दात गोरेंची पाठराखण केली, ठाकरे राजगुरुनगर येथे शिवसेनेचे उमेदवार सुरेश गोरे यांच्या प्रचार सभेत बोलत होते.
"काळे की गोरे" पाहू नका, त्यांच्याकडे मिशा नाही पण विकासाची दिशा आहे - उद्धव ठाकरे - elelction pune
"गोरे काले हुअे तो दिलवाले है", कारण टीका करणाऱ्यांना मन, ह्रदयच नसल्याची टीका त्यांनी केली. गोरे यांना मिशा नाही, मात्र तुमच्या खेड तालुक्याच्या विकासाची दिशा आहे, अशा शब्दात गोरेंची पाठराखण केली, ठाकरे राजगुरुनगर येथे शिवसेनेचे उमेदवार सुरेश गोरे यांच्या प्रचार सभेत बोलत होते.
उद्धव ठाकरे
ईडीच्या कारवाईच्या वेळी पवारांनी साहनभुतीचा एक डोंगर उभा करुन ईडीशी लढले असं दाखवले. मात्र न बोलावता येताच कशाला "येडा की खुळा" न बोलावता येऊ नका. जेव्हा बोलवले जाईल, तेव्हा या! आता शौर्य दाखवु नका, असं म्हणत ठाकरेंनी ईडी प्रकरणावरून पवारांचा समाचार घेतला. यावेळी त्यांनी अजित पवारांचाही खरपूस समाचार घेतला.
Last Updated : Oct 13, 2019, 8:52 AM IST