महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Uday Samant: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे पाहून बाळासाहेबांचा होते भास: उदय सामंत - CM looking Balasaheb Thackeray

मी बाळासाहेबांसोबत ( Balasaheb Thackeray ) काम करू शकलो नाही, पण शिंदे साहेबांकडे ( Eknath Shinde ) पाहून बाळासाहेबांचा भास होतो अशी, भावना राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत ( Industries Minister Uday Samant ) यांनी व्यक्त केली. ते पुण्यात शिवसौनिकांच्या मेळाव्यात बोलत होते.

Uday Samant
Uday Samant

By

Published : Oct 19, 2022, 10:57 PM IST

पुणे - अनेकांनी दसऱ्याच्या दिवशी स्टँडअप कॉमेडी केली. नकला केल्या पण आपल्या दसऱ्या मेळाव्याला सर्वाधिक गर्दी होती. पण आपण मार्केटिंगला कमी पडलो. त्यांनी आपल्याला एक शिवी घातली की आपण त्यांना एक विकासकाम दाखवायचं. मी बाळासाहेबांसोबत ( Balasaheb Thackeray ) काम करू शकलो नाही, पण शिंदे साहेबांकडे ( Eknath Shinde ) पाहून बाळासाहेबांचा भास होतो अशी, भावना राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत ( Industries Minister Uday Samant ) यांनी व्यक्त केली.

मुंबई महापालिका निवडणुकीत दाखवून देऊ -पुण्यात आज मंत्री उदय सामंत यांनी युवा सेनेचा मेळावा घेतला. यावेळी त्यांनी मेळाव्यात आपली भूमिका मांडली. मेळाव्यात ते पुढे म्हणाले की, अडीच वर्षात जे काम झालं नाही ते काल 3 तासांत उपमुख्यमंत्र्यांनी दिल्लीत जाऊन केलं. मुंबई महापालिकेत ( Mumbai Municipal Elections ) आम्ही दाखवून देऊ की कोण पळपुटे आहेत. तसेच यावेळी अंधेरी पोटनिवडणुकीबाबत ( Andheri by-election ) सामंत पुढे म्हणाले की, रमेश लटके जर आज जिवंत असते तर, त्यांनी देखील शिंदेंना पाठिंबा दिला असता.

शिंदेंकडे पाहून बाळासाहेबांचा होते भास

बाळासाहेबांची शिवसेना वाढवणार -उदय सामंत पुढे म्हणाले की शिंदे साहेबांनी घेतलेला निर्णय योग्य होता. हे आता मला कळलं आहे. मी लवकरच कात्रज येथे मेळावा घेणार आहे. कोणीतरी माझ्यावर हल्ला केला म्हणून कात्रजला मेळावा घेणार नाही.अशी समज होती. पण मी मेळावा घेणार आहे. 100 दिवसात केलेलं काम मी या मेळाव्यात मांडणार आहे. बाळासाहेबांची शिवसेना पुण्यात वाढवल्याशिवाय राहणार नाही असं देखील सामंत यावेळी म्हणाले.

दिवाळी कीट बाबत तपासणी -यावेळी सामंत यांना दिवाळी कीट बाबत विचारलं असता ते म्हणाले की, त्या किटवर असलेले स्टिकर हे शासनाचा एक प्रोटोकॉल आहे. इतक्या वर्षात अशी योजना कोणीही आणली नव्हती. ही किट सरकारची देणगी आहे. किट वेळेवर का पोहचली नाही याची तपासणी करणार असल्याचे ते म्हणाले. ते थोडे फार मागे पुढे झाले असेल पण, किट दिले जाईल. तसेच काँग्रेस अध्यक्षपद बाबत सामंत यांना विचारलं असता ते म्हणाले की सगळ्या पक्षाची काम करण्याची पद्धत आहे.जी काही निवडणूक घेतली त्या व्यक्ती वरिष्ठ आहेत. त्यांना शुभेच्छा आहेत काँग्रेस पुढे काय करायचे ते ठरवतील असे मत त्यांनी मांडले.

कार्यकत्यांना मिळणार बिर्यानी - पुण्यामध्ये आपल्याला 1 हजार 500 उद्योजक निर्माण करायचे आहेत. हे युवा सैनिकांना आता टार्गेट आहे. काही लोक आधी सांगायचे की आम्ही वडापाव खाऊन काम केलं. पण तेव्हा शाखाप्रमुख वडापाव खायचा वरचे लोक बिर्याणी खायचे. आता बिर्याणी वरच्या लोकांनी खाल्ली तर, खालचा शाखाप्रमुख देखील बिर्याणीच खाणार. भविष्यत शिंदे साहेब जो उमेदवार देतील त्याला निवडून द्यायचं आहे.असं देखील यावेळी सामंत म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details