पुणे - पिंपरी-चिंचवड परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या उच्च शिक्षित तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या तरुणांकडून ३५ लाख रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये गांजा विक्री करणारे उच्चशिक्षित तरुण अटकेत - पोलीस कारवाई
पिंपरी-चिंचवडमध्ये गांजा विक्री करणाऱ्या दोन उच्च शिक्षित तरुणांना अटक करण्यात आली आहे.

अटक करण्यात आलेले दोन्हीही तरुण उच्चशिक्षित आहेत. यातील एकाने अभियांत्रिकीचे आणि एकाने फार्मसीचे शिक्षण घेतलेले आहेत. याप्रकरणी योगेश दत्तात्रेय जाधव आणि सागर दिगंबर कदम या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. योगेश हा इंजिनिअर असून सागर याने फार्मसीचे शिक्षण घेतलेले आहे. विक्रीसाठी आणलेला गांजा विशाखापट्टणम येथून मागवल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर पोलीस निरीक्षक श्रीराम पोळ यांच्यासह त्यांचे सहकारी कर्मचारी गस्त घालत होते. पथकातील एका कर्मचाऱ्याला द्रुतगती मार्गावर गांजा विक्रीसाठी दोन जण येणार असल्याची माहिती मिळाली होती. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बिटवाईज कंपनी येथे दोघे जण संशयितरित्या उभे होते. त्यांना अमली पदार्थ विरोधी पथकातील कर्मचारी आणि अधिकाऱ्याने सापळा रचून ताब्यात घेतले. पाच गोण्यात ऐकून १५० किलो वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे.