पिंपरी-चिंचवड (पुणे) - गणपती विसर्जनासाठी गेलेले दोन तरुण इंद्रायणी नदीमध्ये बुडाले आहेत. यापैकी एकाचा मृतदेह बाहेर काढण्यात अग्निशमन विभागाला यश आले आहे. ही घटना मोशी येथे रविवारी सायंकाळी घडली. दत्ता आबासाहेब ठोंंबरे आणि प्रज्वल रघुनाथ काळे अशी बुडालेल्या तरूणांची नावे आहेत. यापैकी प्रज्वल याचा मृतदेह मिळून आला असून दत्ता ठोंबरे याचा शोध सुरू आहे.
दोघांनाही येत नव्हते पोहता -
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंद्रायणी नदीमध्ये माऊली वस्ती, डुडळगाव येथील ठोंंबरे कुटुंबातील व्यक्ती सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास गणेश विसर्जन करीता गेले होते. त्यापैकी शिवाजी अर्जुन ठोंबरे (वय ३०), नितीन अर्जुन ठोंंबरे (वय ३९), दत्ता आबासाहेब ठोंंबरे (वय २०) आणि प्रज्वल रघुनाथ काळे (वय १८), हे चौघेजण पाण्यात गणेशमूर्ती विसर्जनसाठी उतरले. ते पाण्यात मध्यभागी गेले असताना त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे दत्ता ठोंबरे आणि प्रज्वल काळे हे दोघेजण पाण्यात बुडाले. त्या दोघांनाही पोहता येत नव्हते. ते मूर्ती विसर्जन केल्यानंतर आत खोल पाण्यात गेले होते. एमआयडीसी भोसरी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवानांनी त्यांचा शोध घेतला असता. यावेळी प्रज्वल काळे यांचा मृतदेह पाण्यात मिळून आला.
हेही वाचा -वर्सोव्यात गणेश विसर्जनादरम्यान 5 मुले समुद्रात बुडाली