जुन्नर (पुणे) - जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील कळमजाई शिवारात पाळीव प्राण्यांवर हल्ला करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावला होता. मात्र, पिंजऱ्यामध्ये बिबट्याच्या ऐवजी त्याचा दोन वर्षाचा बछडा जेरबंद झाला. परंतु पिंजऱ्यात अडकलेल्या बछड्याला भेटण्यासाठी आतुर असलेल्या त्याच्या आईने पिंजऱ्या भोवतीच ठाण मांडल्याने शेतकरी व नागरिकांच्या सुरक्षितेसाठी अखेर त्या बछड्याला पुन्हा सोडून देण्यात आले.
मनिषा काळे यांची प्रतिक्रिया बछड्याच्या सुटकेसाठी आईने मांडले ठाण -
आज सकाळी शेतकरी बाळू खोकराळे, पठाण, संदीप वायाळ यांना शेतात लावलेल्या पिंजऱ्याच्या सभोवताली एक बिबट्या फिरताना दिसला. या पिंजऱ्यामध्ये अडकलेला बिबट्याचा बछडा त्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्यामुळे बछड्याची आई पिंजऱ्याभोवती सैरभैर होऊन फिरत होती. ही घटना वन विभागाला कळविल्यानंतर वन अधिकाऱ्यांनी आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास बिबट्याच्या बछड्याला शिताफीने शेजारीच असलेल्या ऊसामध्ये सोडून दिले.
हेही वाचा - पोलीस ठाण्यातच स्वत:वर गोळी झाडून हवालदाराची आत्महत्या, कारण अस्पष्ट