पुणे- कपडे धुण्यासाठी उच्छिल धरणात गेलेल्या दोन महिलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. जुन्नर तालुक्यतील आंबोली गावात सोमवारी दुपारी हा धक्कादायक प्रकार घडला. सीता रमेश भालचिम (वय-२९) आणि नावडाबाई हेमा कोकाटे (वय-३५ ) अशी मृत महिलांची नावे आहेत.
पाण्यात बुडून दोन महिलांचा मृत्यू, कपडे धुण्यासाठी गेल्या असता घडला प्रकार
आंबोली गावातील दोन महिला गावाजवळ असणाऱ्या धरण पात्रात कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. ज्या ठिकाणी कपडे धुत होत्या तो परिसर निसरडा होता. अचानक सिता भालचिम या महिलेचा पाय घसरला आणि त्या पाण्यात पडल्या. त्यांना वाचवण्यासाठी नावडाबाई कोकाटे पुढे गेल्या असता त्यांचाही पाय घसरला. या घटनेत दोघींचाही बुडून मृत्यू झाला.

दोघींचेही मृतदेह स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहेत. शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.