महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुणे जिल्ह्यातील दोन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू - पुणे जिल्हा लेटेस्ट न्यूज

पुणे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही कमी होताना दिसत नाही, कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण देखील जास्त आहे. जिल्ह्यातील दोन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू
पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू

By

Published : May 24, 2021, 4:16 PM IST

पुणे -जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही कमी होताना दिसत नाही, कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण देखील जास्त आहे. जिल्ह्यातील दोन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. खेड पंचायत समितीचे पशुवैद्यकीय अधिकारी नंदकुमार बेलापुरकर (वय 47 ) व ओझर येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र दुणके (वय 45) यांना पंधरा दिवसांपूर्वी कर्तव्य बजावत असताना कोरोनाची लागण झाली होती. या दोघांवर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला आहे.

पशुवैद्यकीय खात्यातील कर्मचाऱ्यांना फ्रंटलाइन वर्करचा दर्जा देण्याची मागणी

यापूर्वी पशुवैद्यकीय संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रव्यवहार करून, पशुवैद्यकीय खात्यातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना फ्रंटलाइन वर्कर जाहीर करावे, व विमा कवच द्यावे अशी मागणी केली होती. मात्र या पत्राची कोणतीही दखल शासनाकडून घेण्यात आली नाही. आता तरी सरकारने आमच्या मागण्यांची दखल घ्यावी, अशी मागणी पशुवैद्यकीय संघटनेने केली आहे.

हेही वाचा -देशात गेल्या २४ तासांमध्ये ४ हजारांहून अधिक कोरोना बळी; एकूण मृत्यूंची संख्या ३ लाखांवर

ABOUT THE AUTHOR

...view details