पुणे - पिंपरी-चिंचवड शहरात अज्ञात तीन व्यक्तींनी एका वाटसरूला चॉपरचा धाक दाखवून लुटले होते. या प्रकरणी संबंधित व्यक्तीने थेट पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना फोन करून प्रकरणाची माहिती दिली. या प्रकरणी पोलीस आयुक्तांनी निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांना तातडीने आरोपींचा शोध घेण्यास सांगितले. त्यानुसार दोन सराईत आरोपी आणि एका अल्पवयीन मुलाला निगडी पोलिसांनी ताब्यात घेतले. या घटने प्रकरणी पीयूष बापू चव्हाण यांनी निगडी पोलिसात तक्रार दिली आहे.
पिंपरीत वाटसरूला लुटले; 'त्या' व्यक्तीने थेट पोलीस आयुक्तांना केला फोन - police commissioner of pimpari-chinchwad
तीन अज्ञात व्यक्तींनी एका वाटसरूला चॉपरचा धाक दाखवून लुटले होते. या प्रकरणी संबंधित व्यक्तीने थेट पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना फोन करून प्रकरणाची माहिती दिली. त्यानुसार दोन सराईत आरोपी आणि एका अल्पवयीन मुलाला निगडी पोलिसांनी ताब्यात घेतले.
अक्षय संजय छत्री (वय 26 रा. सेनेट्री चाळ पिंपरी, भाजीमंडई, पुणे) आणि सुनिल पोपट गायकवाड (वय 23 वर्षे रा.अण्णाभाऊ साठे वसाहत, ओटास्कीम, निगडी) यांच्यासह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीसीएमसी वसाहत येथे पीयूष बापू चव्हाण यांना अज्ञात तीन व्यक्तींनी चॉपरचा धाक दाखवून लुटले. त्यांच्या खिशातील रोख रक्कम तीन हजार रुपये काढून घेतले. या घटनेची माहिती पीयूष यांनी थेट पोलीस आयुक्तांना फोन करून सांगितली. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जवादवाड यांना माहिती देऊन तातडीने आरोपींचा शोध घेऊन कारवाई करा असे सांगितले. रात्र गस्तीवर असलेल्या पोलीस अधिकारीऱ्याने संबंधित घटनास्थळी जाऊन विचारपूस केल्यानंतर तीन व्यक्तींची नावे समोर आली. त्यांना तातडीने ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. यात एका अल्पवयीन मुलाचा सहभाग आहे.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पहिल्याच दिवशी आल्यानंतर सामान्य नागरिकांना त्यांचा मोबाईल क्रमांक उपलब्ध करून दिला होता. ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त मंचक इंप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सागर कवडे, सुनिलकुमार पिंजण यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, लक्ष्मण सोनवणे, प्रशांत जवादवाड, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर कोकाटे यांच्या पथकाने केली आहे.