पुणे - पिंपरी-चिंचवड शहरात दरोडा विरोधी पथकानेदोन दरोडेखोरांना अटक केली आहे. या दोघांकडून एकूण 1 लाख 78 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कादिर कलीम खान आणि अभिजित ऊर्फ बंगाली सुभाष रॉय अशी या आरोपींची नावे आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरात दोन दरोडेखोर जेरबंद - pimpri chinchawad
पिंपरी-चिंचवड शहरात दरोडा विरोधी पथकाने दोन दरोडेखोरांना अटक केली आहे. या दोघांकडून एकूण 1 लाख 78 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कादिर कलीम खान आणि अभिजित ऊर्फ बंगाली सुभाष रॉय अशी या आरोपींची नावे आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरात दोन्ही आरोपी चोरी आणि घरफोड्या करत होते. गुन्हे शाखा, पोलीस आणि खंडणी दरोडाविरोधी पथक त्यांचा शोध घेत होते. खंडणी पथकाने कारवाई करत दोन्ही आरोपी कादिर खान आणि अभिजित ऊर्फ बंगाली सुभाष रॉय यांना जेरबंद केले आहे. कादिर याच्याकडून 50 हजारांचा लॅपटॉप जप्त करण्यात आला असून सराईत गुन्हेगार अभिजित ऊर्फ बंगाली सुभाष याच्याकडून 18 हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल, 50 हजारांचा अॅपल कंपनीचा आयपॅड आणि 60 हजार रुपये किमतीची दुचाकी असा 1 लख 78 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अभिजित उर्फ बंगाली याच्यावर चोरी, घरफोडी असे गुन्हे दाखल आहेत. शहरातील एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात 9 तर पिंपरी आणि भोसरी पोलीस ठाण्यात प्रत्येकी 1 गुन्हा दाखल आहे.