महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पिंपरीत गंभीर गुन्ह्यांचे कलम कमी करून आरोपीला मदत; दोन पोलीस अधिकारी निलंबित - दोन पोलीस अधिकारी निलंबित

दोन पोलीस अधिकाऱ्यांनी गंभीर गुन्ह्यातील आरोपीविरोधात गुन्हे दाखल करताना कलम करून न्यायालयात अहवाल सादर केल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणी पोलीस आयुक्तांनी कारवाई करत दोन्ही अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे.

officer suspended for help to accused
गंभीर गुन्ह्यांचे कलम कमी करून आरोपीला मदत

By

Published : Dec 23, 2020, 1:56 PM IST

पुणे- गुन्हे गारांवर लावलेली कलमे कमी करून त्यांना जामिनासाठी मदत केल्याप्रकरणी दोन पोलीस अधिकाऱ्यांना निंलबित करण्यात आले आहे. पिंपरी पोलीस ठाण्याचे गुन्हे पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक या दोघांवर आरोपीला मदत केल्याचा ठपका ठेवत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी मंगळवारी ही कारवाई केली आहे. गुन्हे पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे आणि पोलीस उपनिरीक्षक एस.एस. जाधव अशी निलंबित केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची नावे आहेत.

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीचे कलम निरीक्षकांनी केले कमी-

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी परिसरात वाहन तोडफोडीची घटना घडली होती. याप्रकरणी 24 आरोपींना अटक करण्यात आली होती. पैकी, एकावर खुनाचा प्रयत्न, असा गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु, गुन्हे पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे यांनी कलम बदलून 324 कलम लावले, तसा अहवाल त्यांनी न्यायालयात सादर केला. त्यामुळे गंभीर गुन्ह्यातील आरोपीला जामीन मिळाला. त्यामुळे गुन्ह्याचा तपास अत्यंत निकृष्ट दर्जाचा केला असल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

उपनिरीक्षकांची दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपीला मदत-

त्याच बरोबर उपनिरीक्षक जाधव यांनी देखील न्यायालयाकडे अहवाल सादर केला. आरोपींवरील दरोड्याचे कलम कमी करण्याबाबतचा तो अहवाल होता. त्यानुसार या प्रकरणातही आरोपींना जामीन मिळाला. कलम कमी करून आरोपींना जामीन मिळण्यास मदत केल्याचा ठपका ठेवून त्यांचे निलंबन करण्यात आले आहे.


ABOUT THE AUTHOR

...view details