पुणे - कात्रज बोगद्याजवळ मंगळवारी रात्री दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर, एक जण गंभीर जखमी झाला. मृत व्यक्तींपैकी एकाची ओळख पटली आहे तर दुसऱ्याची ओळख पटवण्याचे काम पोलीस करत आहेत.
कात्रज बोगद्याजवळ दुचाकी घसरून अपघात, दोघांचा जागीच मृत्यू - कात्रज बोगदा अपघात बातमी
कात्रज बोगद्याजवळ दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी रात्री ही घटना घडली असून यात एकजण गंभीर जखमी झाला आहे.

अभिषेक किशोर कदम (वय 25) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. जखमी झालेल्या तरुणाचे आडनाव धाबनगावे आहे. त्याला भारती विद्यापीठ रूग्णालयात उपचारासाठी दाखल केलेले आहे. याच अपघातात एक 40 वर्षीय व्यक्तीचा देखील मृत्यू झाला आहे. मात्र, त्याची अद्याप ओळख पटलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, कदम व धाबनगावे हे दुचाकीवरून जात होते. त्यावेळी कात्रजच्या नवीन बोगद्याजवळ त्यांची दुचाकी स्लिप झाली व अपघात झाला. यात कदम यांचा जागीच मृत्यू झाला तर, अनोळखी व्यक्तीला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.