महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुणेकरांची ऑक्सिजनची चिंता मिटणार, पालिकेच्या हॉस्पिटलमध्ये उभारले दोन प्लांट - पुणे दळवी हॉस्पिटल न्यूज

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पुण्यातील रूग्णसंख्या वाढत आहे. परिणामी ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. पण, आता महापालिकेच्या दळवी हॉस्पिटलमध्ये दोन ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आले आहेत. यातून दर मिनिटाला ८०० ते ९०० लिटर ऑक्सिजन तयार होणार आहे.

PUNE
पुणे

By

Published : May 6, 2021, 7:17 PM IST

पुणे - पुण्यात महापालिकेच्या रूग्णालयात दोन ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आले आहेत. दळवी हॉस्पिटलमध्ये हे ऑक्सिजन प्लांट उभारले आहेत. महापौर मुरलीधर मोहोळ, आयुक्त आणि विभागीय आयुक्तांनी याचे उद्घाटन केले.

पुणे पालिकेच्या हॉस्पिटलमध्ये उभारले दोन प्लांट-महापौर मुरलीधर मोहोळ

पुण्यात दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यात गंभीर असलेल्या रुग्णांची संख्याही मोठी आहे. या रुग्णांना ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात गरज भासत आहे. त्यामुळे ऑक्सिजनसाठी पुणे शहरातल्या रुग्णालयांमध्ये मोठी अडचण निर्माण झाल्याचे चित्र गेले काही दिवस पाहायला मिळत आहे. पुणे परिसरतील सरकारी, महापालिका तसेच खासगी रुग्णालयांना जवळपास 320 टन ऑक्सिजनची दररोज गरज आहे. पुणे शहर लगतच्या ऑक्सिजन प्लांटमधून ही गरज भागवण्याचा प्रयत्न होत आहे. त्यातच इतर जिल्ह्याला पुण्यातून ऑक्सिजन पाठवण्यात येत आहेत. त्यामुळे पुणे शहरात ऑक्सिजनचा तुटवडा भासत असल्याचे चित्र आहे. त्यातूनच आता महापालिका रुग्णालयात ऑक्सिजन प्लांटचा प्रयोग महापालिका करत आहे. त्याचाच भाग म्हणून शहरातील ऑक्सिजन पुरवठ्याची अडचण लक्षात घेता पुणे महापालिकेने अवघ्या १५ दिवसात 'ऑक्सिजन जनरेटिंग प्लांट' उभारला आहे.

दळवी हॉस्पिटलमधील ऑक्सिजन प्लांटची पाहणी महापौर मुरलीधर मोहोळ, आयुक्त आणि विभागीय आयुक्त यांनी केली. तसेच याचे उद्घाटनही त्यांनी केले. 'महापालिकेच्या दळवी हॉस्पिटल येथे हा प्लांट तयार झाला आहे. या प्लांटमधून दर मिनिटाला ८०० ते ९०० लिटर ऑक्सिजन तयार होणार आहे. त्यामुळे पुण्यात रुग्णालयांना लागणाऱ्या ऑक्सिजनची गरज आता दळवी रुग्णालयातून पुरवली जाणार आहे. तर शहरात ७ ठिकाणी असे ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभे करण्यात येणार आहेत', असे मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले आहे.

हेही वाचा -विरोधकांनी अभ्यास करून आंदोलन करावे - महापौर किशोरी पेडणेकर

हेही वाचा -शिक्षकांच्या एप्रिल महिन्याच्या वेतनाला सरकारकडून विलंब

ABOUT THE AUTHOR

...view details