महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Pune Crime : मांजरीने लावले दोन बायकांमध्ये भांडण; प्रकरण थेट पोलीस ठाण्यात - पुणे कोयता गॅंग दहशत

आज काल कोणाचा वाद कशावरून होतो याचा अंदाज नाही. पुणे शहरात कधी कोयता गँगची दहशत तर कधी कुत्र्या-मांजरावरू झालेले भांडण थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहचलेले पाहायला मिळते. पुण्यातल्या खडकी परिसरात राहणाऱ्या दोन शेजाऱ्यांमध्ये मांजरीवरून दोन बायकांची जुंपली.

Pune Crime
मांजरीचा वाद

By

Published : Feb 5, 2023, 5:28 PM IST

Updated : Feb 5, 2023, 7:39 PM IST

मांजरीमुळे झालेल्या भांडणावर बोलताना पोलीस अधिकारी

पुणे :तक्रारदार उषा मधुकर वाघमारे (वय ४५, रा. सावंत नगर, पुणे) आणि रेश्मा सलिम शेख (वय ४५, रा. पुणे) असे अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणात अधिक माहिती अशी की, उषा आणि रेश्मा हे पुण्यातल्या खडकी परिसरात एकाच सोसायटीमध्ये शेजारी शेजारी राहत आहेत. रेश्मा यांच्याकडे एक भटकी मांजर आहे. काल (शनिवारी) दुपारच्या वेळेत उषा वाघमारे या घरात कपडे धुवत असताना रेश्मा यांची मांजर त्यांच्या घरात गेली. हे पाहून रेश्माने उषाच्या घरात जाऊन तिला परत आणले. मात्र, या दरम्यान रेश्माने मांजरीला शिव्या देत कोणाच्या घरात जायचे हे कळत नाही का ? असे बोलले. हे पाहून उषा चांगल्याच संतापल्या आणि दोघांमध्ये तू तू, मैं मैं ला सुरुवात झाली. दोघीही एकमेकांना शिव्या देऊ लागल्या आणि नंतर हा वाद टोकाला गेला. उषा आणि रेश्मामध्ये हाणामारी झाली आणि हा वाद थेट खडकी पोलीस ठाण्यात पोहोचला. पोलिसांनी दोघांची बाजू ऐकून एकमेकां विरोधात तक्रार दाखल केली आहे.

पुणेरी कोयता गॅंगला शिकविला धडा :मागच्या महिन्याभरापासून पुणे शहरात कोयता गँगने दहशत माजवली. पर्वा पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असणाऱ्या सिंहगडलॉ कॉलेज परिसरात दोन सराईत गुन्हेगारांनी हातात कोयते घेऊन दहशत माजवली. यानंतर पोलिसांनी 3 फेब्रुवारी, 2023 रोजी दोन सराईत गुन्हेगारांना चांगलाच चोप दिला. पुण्यातील सिंहगड लॉ कॉलेज रोडवर दोन तरुणांनी हातात चाकू सूरे घेऊन दहशत निर्माण केली होती. परिसरातील दुकानांमध्ये जाऊन अनेक लोकांना त्यांनी त्यांच्या हातातील शस्त्रांनी दहशत निर्माण केली. यामुळे एकच गोंधळ निर्माण झाला होता. रस्त्यात जो दिसेल त्याला चाकू दाखवून भीती दाखविली जात असल्याने वाहनधारक देखील स्तब्ध झाले होते. अखेर पोलिसांना सूचना मिळताच पोलीस हजर झाले आणि या दोघा गुंडांना पोलिसांनी चांगलाच चोप देऊन या कोयता गँगचा करेक्ट कार्यक्रम केला.

हेही वाचा :Sangli Crime: घरफोड्या करणाऱ्या अट्टल चोरट्यांना बेड्या; दहा गुन्हे उघडकीस, साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त

Last Updated : Feb 5, 2023, 7:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details