बारामती (पुणे) - शहरातील समर्थनगरमध्ये सापडलेल्या कोरोना संक्रमित रुग्णाच्या 'हाय रिस्क कॉन्टॅक्ट'मधील 12 व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून या तपासणीत कोरोना बाधित रुग्णाचा मुलगा व सून पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे.
समर्थनगर भागात भाजी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या एकास कोरोनाची बाधा झाल्याने त्यास पुढील उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. दरम्यान, या रुग्णाच्या थेट संपर्कात असणाऱ्या 12 नातेवाईकांना तपासणीसाठी पुण्यात पाठविण्यात आलेे होते. नऊ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून पैकी दोघांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सात जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून अन्य तिघांचा अहवाल येणे बाकी आहे.
बारामतीत आणखी दोन रुग्ण कोरोनाबाधित; कुटुंबातील व्यक्तींना लागण
रुग्णाच्या थेट संपर्कात असणाऱ्या 12 नातेवाईकांना तपासणीसाठी पुण्यात पाठविण्यात आलेे होते. नऊ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून पैकी दोघांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
बारामतीत आणखी दोन रुग्ण कोरोना बाधित
लॉकडाऊन दरम्यान कोणत्याही परिस्थितीत घराबाहेर पडू नये. प्रत्येक नागरिकाने आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.