पुणे- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून रुग्णांची संख्या समोर येत आहे. त्यातच काहीजणांचा कोरोनाशी झुंज देताना मृत्यू होत आहे. पुण्यात कोरोनामुळे आणखी दोघांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या आता 10 झाली आहे.
COVID-19: पुण्यात कोरोनाचे आणखी दोन बळी; मृत्यूचा आकडा १० वर - कोरोना महाराष्ट्र अपडेट बातमी
पुण्यातील 44 वर्षीय व्यक्तीचा नायडू रुग्णालयात मृत्यू झाला आहे. श्वसनाच्या त्रासामुळे त्याला रात्री व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. परंतु, रात्री त्याचा मृत्यू झाला. तर ससून रुग्णालयातील आणखी एका रुग्णाचा मंगळवारी रात्री मृत्यू झाला.
हेही वाचा-न्यूयॉर्क शहरात मागील 24 तासामध्ये तब्बल 731 मृत्यू
पुण्यातील 44 वर्षीय व्यक्तीचा नायडू रुग्णालयात मृत्यू झाला आहे. श्वसनाच्या त्रासामुळे त्याला रात्री व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. परंतु, रात्री त्याचा मृत्यू झाला. तर ससून रुग्णालयातील आणखी एका रुग्णाचा मंगळवारी रात्री मृत्यू झाला.
पुणे महापालिकेच्या डॉ. नायडू रुग्णालयामध्ये प्रथमच एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. याठिकाणी आतापर्यंत 150 रुग्ण दाखल आहेत. त्यामुळे नायडू रुग्णालयामध्ये रुग्णांची कॅपिसीटी संपली आहे. त्यामुळे महापालिकरच्या बोपोडी येथील रुग्णालयात रुग्ण हलविले जात आहेत.