पुणे-नाशिक महामार्गावरील खेड घाटात अपघात; दोघे गंभीर जखमी - pune truck accident news
खेड घाटातील अपघात दिवसेंदिवस वाढतच असल्याने वाहतूक कोंडींचे मोठे संकट उभे रहात आहे त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढत आहे. आज दुपारच्या सुमारास भीषण अपघात झाल्याने दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले त्यांना पोलिसांनी तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले व मालवाहतूक ट्रक घाटात पलटी झाल्याने दोन्ही बाजुने वाहतूककोंडी झाली होती.
राजगुरुनगर (पुणे) : पुणे-नाशिक महामार्गावरील खेड घाटात दुचाकी व मालवाहतुक ट्रक अपघात दुपारच्या सुमारास झाला. या अपघातात दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले असून दोघांनाही राजगुरुनगर पोलिसांच्या मदतीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र, अपघात मालवाहतूक ट्रक पलटी झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
खेड घाटातील अपघात दिवसेंदिवस वाढतच असल्याने वाहतूक कोंडींचे मोठे संकट उभे रहात आहे त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढत आहे. आज दुपारच्या सुमारास अपघात झाल्याने दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले त्यांना पोलिसांनी तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले व मालवाहतूक ट्रक घाटात पलटी झाल्याने दोन्ही बाजुने वाहतूककोंडी झाली होती. एक जेसीबी व क्रेनच्या मदतीने मालवाहतूक ट्रकला बाजुला करुन पुन्हा वाहतुक सुरळीत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
सध्या पावसाचे दिवस त्यातच घाटांमध्ये अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या प्रवाशांसह पोलिसांची डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे खेड घाटातील बाह्यवळण मार्गाचे काम लवकरात लवकर व्हावे अशी मागणी होत आहे.